को.ए.सो.नागोठणे मुख्याध्यापक उल्हास ठाकूर सेवानिवृत्त
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील को.ए.सो.च्या गु.रा.अग्रवाल माध्यमिक विद्यामंदिर आणि कै. स.प्र.जैन कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास शंकर ठाकूर हे आपल्या 34 वर्षाच्या सेवेनंतर सोमवार 28 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलनातील अग्रवाल विद्यामंदिरमध्ये अलिबाग येथील ऍड.के.डी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आरएसपी समादेशक रविंद्र वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उल्हास ठाकुर यांचा शिक्षक सेवकांच्या वतीने शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,सन्मानपत्र व भेट वस्तु देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या पत्नी उर्मिला ठाकुर यांनाही साडी नारळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ठाकुर यांचे नातेवाईक, मित्र मंडळी तसेच बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील सर्व सेवक वृंद मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले व 34 वर्षाचा सेवाकाळ अत्यंत निष्ठेने आणि जास्तीत जास्त वेळ शाळेला देणारे ठाकुर सर यांना पुढील भावी आयुष्यासाठी शूभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील तर प्रास्ताविक कैलास गाडे यांनी केले.