मोरे महिला महाविद्यालयात 'जागतिक महिला दिना'निमित्त कार्यक्रमांचे आयोजन
चणेरा/रोहा : रोहित कडू
एम बी मोरे महिला महाविद्यालय धाटाव, रोहा येथे 'जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातील सदस्यांनी विद्यार्थिनीं मार्फत 'महिला सुरक्षा' या विषयावर पथनाट्य बसविले. 'जागतिक महिला दिना'निमित्त रोहा शहर विभागातील को एस सो इंग्लिश मिडीयम स्कुल, नगरपालिका शाळा क्र १० तसेच सी डी देशमुख कन्याशाळा येथील प्रांगणात शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्यातून महिलांचे समाजातील योगदान, सुरक्षा आणि आव्हाने याबाबत प्रबोधनपर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. पथनाट्यात महिला महाविद्यालयातील १३ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला तसेच महिला विकास कक्षातील प्रमुख प्रा दीपाली वारंगे आणि सहकारी प्रा मयुरी लहाने यांनी विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले.
तसेच 'जागतिक महिला दिना'निमित्त पी एन पी नाट्यगृह अलिबाग येथील कार्यक्रमांत रोहा तहसील कार्यालयाच्या साहाय्याने एम बी मोरे महिला महाविद्यालयातील १८ विद्यार्थिनी आणि महिला महाविद्यालयाच्या प्रा प्रतिमा भोईर आणि प्रा मयुरी वानखेडे यांनी देखील सहभाग घेतला.
या कार्यक्रमांचे नियोजन प्राचार्य श्री प्रसन्न म्हसळकर आणि महिला विकास कक्षाच्या प्रमूख प्रा. दिपाली वारंगे यांनी केले.