शेतकरी कामगार पक्ष महादेवखार तर्फे शिवजंयती व पालखी मिरवणुक
रोहा : किरण मोरे
शेतकरी कामगार पक्ष महादेवखार तर्फे शिवजंयती व पालखी मिरवणुक मोठ्या उत्साहात साजरी झाली.
महादेवखार येथे गेल्या ३६ वर्षांपासून शिवजयंती साजरी केली जाते. श्री. गणेश सांस्कृतिक मंडळ महादेवखार व शेकापक्षाचे
पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मंडळ यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. श्री. यशंवतदादा शिंदे यांच्या हस्ते शिव अभिषेक करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता महादेवखार ते बिरगड (बिरवाडी) ता. रोहा येथे अनवाणी मशालज्योत नेण्यात आली. त्यामध्ये महिला मंडळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होतो. दुपारी बेेन्जो ताशा व खालु बाजांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीमध्ये मिरवणुक काढून प्रत्येक घरोघरी महाराजांना आरती करण्यात आली.
याप्रसंगी ग्रामपंचायत महाळुंगे/महादेवखार चे सरपंच श्री. नारायणदादा गायकर, ग्रा.पं. सदस्य सौ. सुचिता शिंदे, ग्रा.पं.सदस्य सौ. निलम धमेंश वारगे, सौ. दर्शना मोरे, श्री. मनोहर वारगे, श्री. प्रतिक गोवधंनदादा कांडणेकर श्री. अनिल मोरे, श्री. चंद्रकांत सातामकर, श्री. नंदेश गायकर, सौ. हिराताई वारगे, सौ. निता गायकर व पक्षाचे कार्यकतें व महिला मंडळ उपस्थित होते.