रोहा सब रजिस्टर कार्यालय दलालांच्या सावटाखाली!
रोहा : समीर बामुगडे
रोहा दुय्यम निबंधक कार्यालय दलालांच्या ताब्यातच असल्यासारखे पहायला मिळत आहे. कोणत्याही कामासाठी व्हाया दलाल कारभार सुरु असल्यामुळे मोठा सावळागोंधळ सुरु आहे.
रोहा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात सध्या मोठी अंदाधुंदी अनुभवायला मिळत आहे. कार्यालयात जाणाऱ्यांना हे कार्यालय शासकीय आहे की खाजगी असा प्रश्न पडतो.
रोहा तालुक्यात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांच्या मुळावर बसणाऱ्या दलालांना धनदाडग्यांना हाताशी धरुन रोहा दुय्यम निबंधक केवळ त्यांच्याच कामाला प्रधान्य देत आहेत. त्यामुळे स्वतःच्या कामासाठी जाणाऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कार्यालयात येणाऱ्या बहुरुपी दलालांमार्फत आलेल्या बिल्डर, उद्योगपती व गुंतवणुदार यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. बड्या मंडळींचे हे दलाल रजिस्टर अधिकाऱ्यांना खुश ठेवत असल्याने ही दलाल मंडळी अधिकाऱ्यांच्या अवतीभोवती रोजच घोळक्याने उभी असतात. काही दलाल कर्मचाऱ्यांच्या खुर्चिचा ताबा घेतात व आणलेल्या कागदपत्रावर स्वता: शिक्के मारतात. त्रयस्थ अनोळखी नागरिकांची कागदपत्रे चाळत बसतात. शासकीय महत्वाचे दस्त वाचत बसणे, सरकारी कार्यालय आपलेच असल्यासारखे उचापती करतात. अधिकाऱ्यांच्या मर्जितले दलाल ठराविक मंडळीचे काम करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांत हे दृश्य पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कार्यालयात प्रत्येक नोंदणीला दलाल मंडळीकडुन अधिकाऱ्यांना ठराविक रक्कमेचा मलिदा दिला जात असल्याची चर्चा आहे. तसेच गावठाणातील प्लॉट खरेदी-विक्रीचे बेकायदेशीर व्यवहार दलालांमार्फत केले जात असल्याची खुली चर्चा सर्वत्र आहे. गावठाणातील व रोहा शहराजवळचे विशेषतः वरसे येथील बेकायदेशीर बांधकामात खरेदी -विक्रीचे व्यवहार दलाला मार्फत नोदणी होत आहे. ठराविक अधिकाऱ्याच्या मर्जितीले काही दलाल ही कामे चुटकीसरशीनी करतात. त्यातच वरील अनेक कार्यालयात दलाल मंडळीची मुले कार्यालयातील कपाटे तसेच महत्वाचे कागदपत्रे हाताळताना अनेक वेळा नागरिकांच्या नजरेत येत असतात. कित्येक वेळा दलाल मंडळीचे ठरावीक साक्षीदार अनेक दस्तावजावर सह्या ठोकण्याचे काम करीत असतात. दलालांच्या कार्यालयातील हस्तक्षेपामुळे महत्वाची दस्त गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गंभीर बाब आहे.
या कार्यालयात खरेदी-खत करताना मोजणी नकाशाच्या क प्रतीची मागणी करून व गरज नसताना दलालांच्या मार्फत लुटमार करण्याचा धंदा तेजीत आहे. तसेच तीन महिन्यानी या अधिका-याची बद्दली होणाच्या मार्गावर आहे. त्यामुळे जाता जाता खादाडगि्री म्हणून सब रजिस्टर अधिकारी यानी खो-यानी माया जमवण्याचा सपाटा लावला आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या सर्व प्रकारावर उच्चस्तरिय अधिकाऱ्यांनी खाते निहाय गुप्त चौकशी करणे गरजे आहे,
कार्यालयत येणा-या गोरगंरिब व ज्येष्ठ नागरिकांची कामे झटपट होणे आवश्यक आहे. अधिकाऱ्याचा दलाल मंडळीना असलेला आशीर्वादामुळे विलंब होत असल्याची ओरड जनता करीत असुन, याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून कार्यालयातील दलाल मंडळीना वेळीच चाप लावला पाहीजे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सध्या तरी जोर धरत आहे.