कोलाड विभागातील २० अंगणवाडी केंद्रातील कुपोषित मुलांसाठी ३१५ पोषण पोटलीचे वाटप

रोहा : किरण मोरे

जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्धारातून आदिवासी बांधवांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केलेल्या सप्तसुत्री कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीचा भाग म्हणून एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत स्वामीराज फाऊंडेशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील विविध अंगणवाडी केंद्रातिल ६ महीने ते ६ वर्षे वयोगटातील कुपोषित बालकांना पौष्टीक आहाराचे वाटप करण्याचे काम चालू आहे. कोलाड विभागातील २० अंगणवाडी केंद्रातील कुपोषित मुलांसाठी ५ कि.ग्रॅ. च्या ३१५ पोषण पोटली चे वाटप कोलाड अंगणवाडी केंद्रात संपन्न झाले. उत्तम आहार व शिक्षणाचे महत्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्यात आले. सदर कार्यक्रमास श्री दिपेश सर, रोहा अंगणवाडी बीट सुपरवायर सौ घाडगे मॅडम, तलाठी मनोरे, स्वामीराज फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री जयेश माने, फाऊंडेशन  कार्यकारी सदस्य श्री उमेश वादल, श्री राजेश जाधव, खजिनदार श्री मारुती चव्हाण, महिला सक्षमीकरण अध्यक्ष सौ.संजीवनी माने, सह खजिनदार श्री विनायक माने व कोलाड बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कुपोषित बालकांना संबंधितांकडून पोषण अहाराचे वाटप करण्यात आल्याने पालक वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Popular posts from this blog