एम. बी. मोरे फाउंडेशन सामाजिक सेवा संस्था धाटाव संचलित महाविद्यालयामधील विद्यार्थिनींचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा 

चणेरा/रोहा : रोहित कडू

एम. बी. मोरे फाउंडेशन सामाजिक सेवा संस्था धाटाव संचलित महाविद्यालयामधील पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थिनींचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न झाला.

यावेळी पालकमंत्री आदितीताई तटकरे व संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयराव मोरे, प्रांताधिकारी श्री. यशवंत माने, तहसीलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, प्राचार्य प्रसन्ना मसलकर, अशोक मोरे, प्रथमेश मोरे तसेच सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व यशस्वी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या पदवीचा उपयोग करून जगाकडे स्वतंत्र दृष्टीकोनातून पाहायला शिकावे व एक जबाबदार नागरिक म्हणून समाजासाठी आपले योगदान द्यावे. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर व कर्तृत्वावर दैदिप्यमान यश प्राप्त करून महाविद्यालयाचे व विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करावे असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. 

Popular posts from this blog