उष:काल फाउंडेशन तर्फे सन्मान सोहळ्याचे आयोजन

माणगाव : प्रमोद जाधव

माणगाव तालुक्यातील नव्याने सुरू झालेल्या व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम दाखवून आपले अस्तित्व उभे करणाऱ्या उष:काल फाउंडेशन तर्फे शासकीय सेवेत उल्लेखनीय काम करून सेवा बजावणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांचा ३ एप्रिल रोजी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

उष:काल फाउंडेशन चे संस्थापकीय अध्यक्ष नामदेव शिंदे यांच्या पत्नी उषा शिंदे या शासकीय सेवेत परीचारिका म्हणून कार्यरत होत्या, तर त्यांचे बंधू आदीप शिंदे हे कृषी विद्यापीठाचे सुवर्णपदक विजेते होते. यांच्या स्मरणार्थ शिंदे कुटुंबीय व हितचिंतक यांनी उष:काल फाउंडेशन तर्फे आरोग्य, शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, लिंग भेद व सार्वजनिक सेवा या क्षेत्रात काम सुरू केले आहे.

यावेळी उष:काल फाउंडेशन कडून सार्वजनिक सेवा क्षेत्रात तळा-गाळात काम करणाऱ्या सेवकांना सन्मानित करण्याचे ठरविले आहे. हा पहिला सन्मान सोहळा ३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता माणगाव तालुक्यातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर (मुंबई -गोवा हायवे) याठिकाणी सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.तरी या सन्मान सोहळ्यास सेवा क्षेत्र व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे असे अवाहन उष:काल फाउंडेशन चे संस्थापकीय अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी केले आहे.

Popular posts from this blog