निजामपूर नवनियुक्त उपसरपंचांचा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी केला सत्कार
माणगांव : प्रमोद जाधव
माणगाव तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत निजामपूर च्या उपसरपंच पदी निजामपूर येथील भारतीय जनता पार्टी चे सदस्य असलेल्या गणेश मारुती कासार यांची वर्णी लागली यानंतर निजामपूर विभागातील असंख्य भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी गणेश कासार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य विधानपरिषद चे विरोधी पक्षनेते व रायगड मधील पोलादपूर कोतवाल बुद्रुकचे सुपुत्र आमदार प्रवीण दरेकर हे होलिका उत्सवा दरम्यान १८ मार्च रोजी आपल्या मूळगावी आल्यानंतर त्यांनी निजामपूर गृप ग्रामपंचायत चे भाजप चे नवनिर्वाचित उपसरपंच गणेश कासार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभाच्या वेळी निजामपूर उपसरपंच कासार व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य हाऊसिंग बोर्ड चे अध्यक्ष प्रकाश दरेकर, माणगांव तालुक्यातील प्रवीण दरेकर यांचे निकटवर्तीय व विश्वासू स्नेही राकेश गोसावी, भाजप निजामपूर विभाग अध्यक्ष गोविंद कासार, भाजप पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, विळे विभागातुन केतन कोदे,महेश सुतार आदी उपस्थित होते.
यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेत्यांनी नवनियुक्त उपसरपंच यांच्याशी केली निजामपूर मधील विकासकामाविषयी चर्चा केली.तसेच लवकरात लवकर म्हणजेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीपूर्वी निजामपूर विभागातच नव्हे तर संपूर्ण माणगांव तालुक्यात भाजप स्व-बळावर निवडणूकांना कसे सामोरे जाणार व निजामपूर विभागात सध्या दोन ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टी चे सदस्य आहेत त्यामध्ये कश्याप्रकारे वाढ करता येईल याकरीता कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरासोबत, निजामपूर मधील विकासकामाचा आढावा, प्रलंबित विकासकामे व आगामी व्युव्हरचना कार्यक्रम घेण्यात असल्याचे असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.