महाशिवरात्र निमीत्ताने पालेखुर्द गावात श्री शिवशंभो महाअभिषेक सोहळा संपन्न
रोहा : प्रतिनिधी
पालेखुर्द गावचे अध्यक्ष श्री महेश ठाकुर व सौ.सोनाली महेश ठाकुर दांम्पत्यांच्याहस्ते श्री शिवशंभो महाराज अभिषेक सोहळा व विधीवत पुजा संपन्न झाली. महाशिवरात्र निमीत्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पालेखुर्द गावत श्री शिवशंभो मंदीरात अभिषेक सोहळा व विधीवत पुजा गावचे अध्यक्ष श्री महेश ठाकुर व सौ.सोनाली महेश ठाकुर या दाम्पत्यांच्या हस्ते सकाळी श्री शिवशंभो मंदीरात संपन्न झाली.
दिवसभरात मोठ्या उत्साहाने भाविकांनी श्री शिवशंभो महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी वारकरी संप्रदाय पालेखुर्द यांच्या वतीने हरिपाठ व भजन केले. यावेळी गावातील ग्रामस्थ व महीला मंडळ, युवक मंडळ, वारकरी संप्रदाय पालेखुर्द यांची प्रमाणात उपस्थिती होती.