विश्वनिकेतन महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरीपदी ऋत्विज माने
प्रथमच कॉम्पुटर विभागाकडे जनरल सेक्रेटरी पद
नागोठणे : महेंद्र माने
खालापूर तालुक्यातील कुंभिवली येथील विश्वनिकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील महत्वाच्या जनरल सेक्रेटरी (जी.एस.) पदी कॉम्पुटर विभागाचा ऋत्विज माने याची निवड करण्यात आली. महाविद्यालयाच्या स्थापने पासूनच्या इतिहासात प्रथमच कॉम्पुटर विभागाकडे जनरल सेक्रेटरीपद आल्याने कॉम्पुटर विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहेत. स्टुडन्ट वेलफेअर हेड सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 2021-22 वर्षासाठी जनरल सेक्रेटरीपदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनरल सेक्रेटरी- ऋत्विज माने, लेडीज रिप्रेजेंटेटिव्ह- धनश्री पाटील, ट्रेजरर- व्रिक्ष पंडितपौत्र व दीपक सिंग, कल्चरल सेक्रेटरी- ओमकार माने, जॉईंट कल्चरल सेक्रेटरी- हिमांशू तेरडे, टेक्निकल सेक्रेटरी- वेदांत गोडसे, जॉईंट टेक्निकल सेक्रेटरी- सुरज नायक, स्पोर्ट्स सेक्रेटरी- आदित्य काटे, जॉईंट स्पोर्ट्स सेक्रेटरी- श्रेयश धनावडे, डिसीप्लीन सेक्रेटरी- साहिल पाटील, जॉईंट डिसीप्लीन सेक्रेटरी- चिन्मय म्हात्रे व वॉलेंटियर हेड- अभिजीत मेलव्हीन यांची निवड करण्यात आली. जनरल सेक्रेटरी ऋत्विज माने व सर्व पदाधिकार्यांचे महाविद्यालयाचे व्हाईस प्रेसिडेंट संदीप इनामदार,प्राचार्य डॉ. शंकर कदम यांच्यासह महाविद्यालयाच्या मॅकनिकल, सिव्हिल,कॉम्पुटर, इलेक्ट्रिकल व एआयएमएल या विभागाचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक तसेच विद्यार्थी व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
मी महाविद्यालयाचा जनरल सेक्रेटरी झाले असलो तरीही हा बहुमान कॉम्पुटर विभागासह सर्व विभागाचा आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना काळात आपण महाविद्यालयात कोणत्याही प्रकारचे इव्हेंट साजरे करू शकलो नसलो तरीही या वर्षी घेण्यात येणार्या सर्व इव्हेंट हे सर्वांच्या सहमतीने व सहकार्याने होणार असून आजपर्यंत आपण मला दिलेली साथ अशीच कायम राहू द्या.
- कु. ऋत्विज महेंद्र माने
जनरल सेक्रेटरी, विश्वनिकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग-कुंभिवली