वर्धमान बिल्डींग वरसे येथे जागतिक महिला दिन साजरा
रोहा : समीर बामुगडे
रोहा येथे वर्धमान बिल्डिंग वरसे येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या महिला बऱ्याच महिला एकत्र आल्या. त्यात त्यांचा सन्मान करण्यात आला. या महिला दिनानिमित्त कोकण विभाग प्रमुख दीपिका चिपळूणकर, मनोलु गुरव राजश्री पाटील विद्या झोलगे, रिकू पायगुडे यांच्यासह अनेक महिलांनी एकत्र येऊन केक कापून जागतिक महिला दिन साजरा केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा पाटणकर यांनी केले.
8 मार्च आज आपण येथे सर्वांनी महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत तर यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेला संघर्ष दर्शन देणाऱ्या जिजामाता प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हटले जाते हे सिद्ध करणारे अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेत. श्री शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेतलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले स्वतः शिकून वारसा चालवला. आज स्त्री पुरुष समानता ही समाजाला आचरणात आणायला हवी. प्रत्येक समाजात स्वतःची ओळख निर्माण करीत आहे. त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. समाजात मुला मुलींना जन्म देताना विचार केला जातो मुलींचा तिरस्कार केला जातो, महिलांचा अपमान केला जातो, अत्याचार करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ती महिला कोणाची तरी आई आहे बहीण आहे व मुलगी आहे! आपला इतिहास इतिहास आता हिरकणी सारखी एकाही होऊन गेली जे स्वतःच्या बाळाच्या प्रेमापोटी रायगडचा उभा कड उतरून आली झाशीची राणी होऊन गेली जी बाळ पाठीवर बांधून त्यावरील त्यावरून स्त्री एक अथांग शक्तीचे रूप आहे हे समजते.
कोकण विभाग प्रमुख दीपिका चिपळूणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मनोलु गुरव, राजश्री पाटील, विद्या झोलगे, प्रियेशा गिजे, विनिता जंगम, मानसी शिरसागर, रिंकु पायगुडे, रेश्मा पाटणकर, कल्पिता म्हस्के रेश्मा पाटणकर यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या.