राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेत ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंची सुवर्ण भरारी
सातारा : प्रतिनिधी
सातारा वाई येथील देवगिरी गार्डन येथे युनिफाईट वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र आणि युनिफाईट वेल्फेअर असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नवव्या राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेत डॉ. मंदार पनवेलकर सर व समिक्षा दिपक कायंदेकर यांच्याकडे युनिफाईट, कराटे, किक बॉक्सिंग आणि सेल्फ डिफेन्स व इतर खेळांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंनी युनायटेड शोतोकान असोसिएशन पनवेल चे नाव महाराष्ट्रात आणि परदेशात उंचावले आहे.
या स्पर्धेत कु. अर्णव संतोष पाटील, कु. वेदांत दिपक कायंदेकर यांना सुवर्णपदक आणि कु. अस्मि सचिन मटकर हिला रजत पदक मिळाले. या स्पर्धेत महाराष्ट्रातुन 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला.
या विजयी खेळाडूंचा सत्कार महाराष्ट्र युनिफाईट चे अध्यक्ष श्री संतोष खंदारे, सचिव आणि प्रशिक्षक डॉ. मंदार पनवेलकर, निलेश भोसले, सागर कोळी, प्रशांत गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आला. या विजयी खेळाडूंची निवड हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.