शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तीमत्त्व श्री दिनेश खंडागळे सर
नागोठणे : प्रतिनिधी
नागोठणे येथील इझी वे स्पोकन इंग्लिश क्लासेसचे निर्माते समाजसेवक आदर्श व्यक्तीमत्त्व तरूण पिढीला इंग्रजी भाषेचे ज्ञानार्जन करणारे श्री दिनेश खंडागळे सर हे केवळ नागोठणेच नाही तर रोहा ते पाली माणगाव ते महाड आणि पेण पर्यंत च्या गावोगावी स्पोकन इंग्लिश चे धडे गिरविण्याचे व शिकवण्याचे काम या व्यक्तीने केले आहे. त्यांचे करावे तितके कौतुक खूपच कमी आहे.
सन 2013 पासुन आजपर्यंत हजारोच्या वर विद्यार्थ्याना या कोर्सचा लाभ झालेल्या आहे. आजही पत्राद्वारे व्हाट्सअप द्वारा त्यांना विद्यार्थ्यांचे मेसेज येतात व आभार व्यक्त करतात. 17 जुन 2013 ला या इंस्टिट्यूटची उभारणी केवळ 10-20 विद्यार्थी सोबत घेऊन सुरू केली. आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले दिसुन येते. दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 8 पर्यंत अध्यापन कार्य चालु असते. 2020 पासून कोरोणा काळातही ऑनलाइन पद्धतीने क्लासेस अखंडपणे चाळू ठेवून एक आदर्श ज्ञानार्जनाचे काम दिनेश खंडागळे सर यांच्या हस्ते होत आहे व पुढेही राहणार आहे. त्यांचे आदर्श आजच्या तरुणांनी घेणे महत्त्वाचे आहे.
अवघ्या ५० दिवसात अस्खालित पणे इंग्लिश बोलता येते तसेच व्याकरण, सुसंवाद आणि पत्र लेखन इत्यादी विद्यार्थी कमी वेळात लिहायला शिकतात. इंग्रजी बोलणे व लिहिने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्याचा फायदा नोकरी मिळविण्यासाठी व्यावसायासाठी तसेच स्वत:च्या व्यक्तीमत्व विकासासाठी अतिशय झालेला आहे . असे दिसून येते. अशा इंस्टिट्यूट मधून आपण चांगले युवक घडवतात हे खरेच समाजोपयोगी कार्य आहे. अगदी माफक फी मध्ये येवढे ज्ञानार्जनाचे काम कोणीही करू शकत नाही. केवळ वयाच्या २3 व्या वर्षापासून फक्त बी एस सी पूर्ण केलेला हा तरूण स्वत:च्या बौद्धिक क्षमतेने आणि परिश्रमाने हे सारे उभे केले आहे. हे एक विशेष आहे.