मोरे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश
चणेरा/रोहा : रोहित कडू
एम. बी.मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, धाटाव, रोहा येथील विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सहभाग घेवून यश संपादन केले. 'शिवाजी महाराज सामाजिक संस्था' व 'रायगड जिल्हा माहिती कार्यालय' यांच्या संयुक्त विद्यमाने 27 फेब्रुवारी, 'मराठी राजभाषा दिना'निमित्त राज्यस्तरीय निबंधे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत एम. बी.मोरे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला त्यापैकी कु गायत्री सत्यवान गिरप, इयत्ता 11वी वाणिज्य हिने प्रथम क्रमांक आणि कु श्रेया दीपक पाबरेकर, इयत्ता 11वी कला हिने द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धेतील विजेत्यांना उरण येथे झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
विजेत्या स्पर्धकांनी महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक प्रा. हणमंत ढवळे आणि प्रा. विवेका देशमुख यांच्या मार्गदर्शनद्वारे या ऑनलाइन स्पर्धेत सहभाग घेतला. सर्व वर्गशिक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री प्रसन्न म्हसळकर आणि संस्थेचे अध्यक्ष श्री विजयराव मोरे यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले