श्री भैरवनाथ इलेव्हन यशवंतखार यांच्या तर्फे श्री अमृतेश्वर चषक व कुस्त्यांचे जंगी सामने संपन्न
रोहा : प्रतिनिधी
महाशिवरात्री उत्सव निमित्त श्री भैरवनाथ इलेव्हन यशवंतखार यांच्या तर्फे श्री अमृतेश्वर चषक चे आयोजन करण्यात आले होते. तसेच कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन अलिबाग रोहा मुरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष व माजी राजिप सदस्य श्री नंदकुमार म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
क्रिकेट सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक जय खंडोबा चोरडे, द्वितीय क्रमांक श्री भैरवनाथ इलेव्हन यशवंतखार, तृतीय क्रमांक जय भवानी आरे बुद्रुक, तसेच मॅन ऑफ दि सीरीज, मॅन ऑफ दि मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन अशी विविध बक्षिसे देण्यात आली. तसेच कुस्त्यांच्या जंगी सामन्यांमध्ये १०० कुस्त्या झाल्या. त्यामध्ये प्रथम क्रमांक वाडगाव, द्वितीय क्रमांक आंदोशी तसेच, तृतीय क्रमांक यशवंतखार संघाने पटकावला.
याप्रसंगी आमदार श्री अनिकेत भाई तटकरे, माजी राजिप सदस्य श्री नंदकुमार म्हात्रे, रायगड भूषण व क्रीडा संघटक श्री हिरामण भोईर, मुंबई उत्कर्ष मंडळ अध्यक्ष श्री रामचंद्र म्हात्रे, हेमंत ठाकूर, संतोष भोईर, नथुराम ठाकूर, चंद्रकांत तांबडे, पांडुरंग ठाकूर, विलास दिवकर, नरेश म्हात्रे, परेश ठाकूर, नितेश ठाकूर, जगन्नाथ ठाकूर, गणेश मढवी, दत्ताराम दिवकर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.