ताम्हणशेत आदीवासी वाडीतील गरजू-गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ व महिलांना साडी वाटप
रोहा : किरण मोरे
ताम्हणशेत आदीवासी वाडीतील गरजू आणि गरीब मुलांना वाढदिवसानिमित्त एस व्ही एज्युकेशन जेईी/निट/सीईटी संस्थेचे संस्थापक विज्ञान खवरे यांनी सामाजिक बांधिलकीतून शैक्षणिक साहित्य स्कूल बॅग, पुस्तके, खाऊ आणि वयोवृद्ध महिलांना साडी वाटप करून माणूसकीचा धर्म पाळला आहे.
गेली एकवीस वर्ष झाले ही संस्था शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. सुरुवातीला ग्रामस्थांच्या सहभागाने परिसर स्वच्छ करण्यात आला. शैक्षणिक या मुलभूत गरजेपासून आणि भौतिक सुविधांपासून कोसोदूर असलेल्या आदीवासी समाजातील लोकांना शिक्षणाबाबत विज्ञान खवरे यांनी मार्गदर्शन केले.तसेच महिला सबलीकरण तेव्हाचं होईल जेव्हा दुर्लक्षित आणि गरजू घटक शिक्षण प्रवाहात येतील. यासाठी आदिवासी वाड्यापर्यंत शिक्षणाच्या सोयी पोहचवणे सर्वांचे कर्तव्य आहे.असे राणी खवरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी संस्थापक शिक्षक श्री विज्ञान बाळासाहेब खवरे, सहसंस्थापक सौ राणी विज्ञान खवरे आयोजक श्री सचिन हावळे, सौ वैशाली हावळे, श्री काशिनाथ कदम, नियोजक व सूत्रसंचालन कु. सृष्टी वाणी, कु. ओम पाशिलकर, साहिल बोथरे, वरद खवरे, वेदांती खवरे, शर्विल हावळे, तांबडी ग्रामपंचायत सदस्य परशुराम पवार, अंगणवाडी मदतनीस अरुणा पवार, ग्रामस्थ केशव जाधव व इतर उपस्थितीत होते.