रायगड पोलीस मुख्यालय अलिबाग येथे माणुसकी प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर

रायगड : शेखर सावंत

रायगड पोलीस अधीक्षक श्री अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक श्री अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीस, माणुसकी प्रतिष्ठान, जिल्हा सामान्य रुग्णालय, सहवेदना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालय जंजिरा हॉल येथे  रायगड पोलीस महिलांकरीता विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी डॉ. ओजस्विनी तांबोळी, डॉ. प्रतिभा म्हात्रे, डॉ. मेघा घाटे, डॉ. किर्ती साठे, डॉ. अर्चना सिंग, डॉ. नीता माने, डॉ. कलिका देवकते, डॉ राजाराम हुलवान, डॉ. अश्विनी हुलवान, डॉ. अक्षय कोळी, डॉ. नीरज कोळी, डॉ. प्रज्योत पाटील या तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.

माणुसकी प्रतिष्ठान कडून मोफत औषधोपचार देण्यात आले. सहवेदना ग्रुप कडून स्त्रियांमधील स्तनांचे कर्करोग याबद्दल माहिती देण्यात आली  व स्व परीक्षण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले, मनोरोग तज्ञ डॉ. अर्चना सिंग ताणतणावाच्या काळात मन शांत ठेवून आनंदाने आपली ड्युटी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले.

जिल्हा सामान्य रुग्णालय कडून रक्त तपासणी, क्षयरोग निर्मूलन जनजागृती, थुंकी तपासणी करण्यात आली. श्री जगदीश काकडे पोलीस उप अधीक्षक, राखीव पोलीस निरीक्षक प्रकाश मोकल   यांच्याकडून या  शिबिराचे नियोजन करण्यात आले.

फक्त महिला दिना दिवशीच महिलांचा आदर  सन्मान न करता संपूर्ण वर्षभर त्यांचा आदर राखला पाहिजे व त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत आपणही मुलाप्रमाणे मुलींना देखील समान वागणूक द्यावी असे रायगड जिल्हा अधीक्षक अशोक दुधे यांनी आपल्या मार्गदर्शनात वक्तव्य केले.

Popular posts from this blog