पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान व आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून कोलाड येथे महिलांच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

चणेरा/रोहा : रोहित कडू

रायगडच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान व आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून कोलाड येथे महिलांच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यावेळी आमदार श्री. अनिकेतभाई तटकरे यांनी मशाल प्रज्वलित करून या स्पर्धेचे उद्घाटन केले. या कबड्डी सामान्यांमध्ये रायगड जिल्ह्यातून अनेक नामवंत कबड्डी संघांनी सहभाग घेतला. 

कबड्डी हा तांबड्या मातीतील मर्दानी खेळ असून रायगड जिल्ह्याला कबड्डीची पंढरी म्हणून ओळखले जाते. रायगडच्या मातीतील खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची धमक आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांना नवनवीन संधी उपब्ध करून देण्यासाठी येत्या काळात रायगडमध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय कबड्डी सामने आयोजित करण्याचे नियोजन आहे. 

याप्रसंगी अर्जुन पुरस्कार विजेत्या श्रीमती शकुंतला खटावकर, भारत श्री सागर कातुर्डे, आपत्कालीन परिस्थितीत मोलाचे मदत कार्य करणारे श्री. महेश सानप व करोना काळात वैद्यकीय मदत केल्याबद्दल श्री. राजेश मटकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही देण्यात आल्या.

Popular posts from this blog