बापूजी क्रिकेट संघ घोटवल व श्री दिपकशेट जाधव मित्र मंडळ आयोजित पालकमंत्री रायगड चषक क्रिकेट स्पर्धा २०२२ संपन्न 

कोलाड : प्रतिनिधी

बापूजी क्रिकेट संघ घोटवल व श्री दिपकशेट जाधव मित्र मंडळ आयोजित पालकमंत्री रायगड चषक क्रिकेट स्पर्धा २०२२ संपन्न  झाली. 

यामध्ये प्रथम पारितोषिक १,०१.०००/-  व चषक, या स्पर्ध्येचा प्रथम विजेता संघ वैष्णवी ११ कोलाड यांना देण्यात आले. द्वितीय क्रमांक श्रेया स्पोर्टस् अलिबाग, तृतीय क्रमांक क्रमांक  श्रेयस ११ रोहा, चतुर्थ क्रमांक भोपळी पेण माणगांव अशा प्रकारे बक्षीसे देण्यात आली.

या स्पर्धेत दि. २० मार्च २०२२ ते १३ मार्च २०२२ या चार दिवसांमध्ये ३२ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून भोपळी पेन माणगांव संघाचा सनी गुलगुळे ठरला. त्यास सायकल व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

उत्कृष्ठ फलंदाज श्रेया स्पोर्ट संघाचा प्रफुल पाटील उर्फ पिंट्या यास चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ठ गोलंदाज वैष्णवी ११ कोलाड संघाचा  विकी पुजारी यास चषक देऊन सन्मानित करण्यात आले. 

सर्व विजयी खेळाडूंचे श्री दिपकशेट जाधव, श्री सुभाषशेठ दळवी, श्री हरेश गजमल, श्री पंकेश येळकर, श्री विलासशेठ येळकर, श्री गोविंद शिंदे, श्री सागर खानविलकर तसेच घोटवल क्रिकेट संघातर्फे अभिनंदन करण्यात आले.

Popular posts from this blog