माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी जनतेच्या हक्काचा आवाज बनून प्रशासनातील भ्रष्टाचार बाहेर काढावा, माहिती अधिकार कयदा हा सर्वसामान्यांच्या हिताचा कायदा आहे - सुभाष बसवेकर
ठाणे : प्रतिनिधी
माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी प्रशासनातील भ्रष्टाचार बाहेर काढून जनजागृती करावी तसचे जनतेच्या करातून जमा झालेल्या निधीची उधळपट्टी चालली असून हा निधी शासन व प्रशासनाने काटेकोरपणे व काटकसरीने खर्च करावा म्हणून सरकारवर दबाव आणावा असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेेकर यांनी केले. घोडबंदर रोड ठाणे येथे २७ मार्च २०२२ रोजी आयोजित केलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या कोकण विभाग कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
सुभाष बसवेकर पुढे बोलताना म्हणाले की, माहिती अधिकार कायदा हा सामान्य माणसांच्या हिताचा कायदा आहे. हा कायदा निष्प्रभ करण्याचा शासन व नोकरशाहीचा डाव असून तो जनतेने हाणून पाडला पाहिजे. तसचे या कायद्याचा जनसामन्यांत जाऊन आपण प्रचार व प्रसार केला पाहिजे. कार्यकर्त्यांनी ज्ञान घेऊन प्रमाणिकपणा जपून व समाजिक कल्याणाचे भान ठेवून लोकहितासाठीच या कायद्याचा वापर केला पाहिजे. आजच्या काळात राजकारणाला महत्त्व आले असून समाजकारण मागे पडत चालले आहे. समाजाच्या गरीब व सामान्य माणसांच्या हिताचा प्राधान्यक्रम हरवला आहे. अशा वेळी माहिती अधिकार कार्यकत्यांनी लोकांच्या हक्काचा आवाज बनले पाहिजे असे प्रतिपादन सुभाष बसवेकर यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी रघूनाथ कडू, सुशील सिंग, बाळू साळवे, माया मगर,कामेश घाडी, सुनिल बूधा खूटाडे इत्यादी मान्यवर हजर होते.
कार्यक्रमाचे संयोजन ठाणे जिल्हा माहिती अधिकार महासंघ पदाधिकारी श्री. दयानंद उल्मीक व शकील शेख यांनी केले. या कार्यक्रमासाठी कोकण विभागातून विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यामधून बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.