ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स सर्कल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांची नियुक्ती

रोहा : समीर बामुगडे 

ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर मुरुड-जंजिराचे ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांची नियुक्ती संघटनेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत मध्ये करण्यात आली.

यासिन पटेल, केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार, संघटनेचे विश्वस्त गणेश कोळी यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली. किरण बाथम 1987 पासून एक निर्भीड पत्रकार म्हणून सर्वांना परिचित आहेत. 2002 साली त्यांना रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा रायगड जिल्हा युवा पत्रकार पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर त्यांना सातत्याने असंख्य पुरस्कार मिळाले. महाराष्ट्रात लोकपाल बील आंदोलन काळात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारें यांनी देखील त्यांचा निर्भीड पत्रकार म्हणून आंदोलन यात्रेत विशेष सत्कार केला होता. मुंबई-सकाळ,लोकसत्ता, सामना,नवाकाळ, पुण्यनगरी अशा अनेक राज्यस्तरीय तसेच इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांमध्ये सहारा-समय,आयबीएन, जय महाराष्ट्र, साम टीव्ही पासून आजतक, इंडिया टीव्ही अशा वाहिन्यांमध्ये त्यांनी काम केले. सध्या मुंबईच्या दै. महानगरी टाइम्समध्ये किरण बाथम कार्यकारी संपादक म्हणून सक्रीय पत्रकारिता करत आहेत.

किरण बाथम यांच्या नियुक्तीमुळे संघटनेत नवचैतन्य निर्माण होईल असे मत यासिन पटेल, गणेश कोळी तसेच बाळकृष्ण कासार यांनी व्यक्त केले. रायगड जिल्हा तसेच पनवेल, नवी मुबंई, मुंबईसह राज्य भरातून किरण बाथम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

Popular posts from this blog