अतुल काळे मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेचे जोगेश्वरी नगर B प्रथम क्रमांकाचे मानकरी

भाईसाहेब टके यांच्या हस्ते झाले उद्घाटन

नागोठणे : महेंद्र माने

नागोठणे येथील अतुलदादा काळे मित्र मंडळ व ओमकार क्रिकेट क्लब, कोळीवाडा आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट सर्धेचे जोगेश्वरी नगर क्रिकेट संघ B प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. 

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आठवडा बाजाराच्या भव्य मैदानात शनिवार 12 मार्च रोजी घेण्यात आलेल्या भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन शिवराम शिंदे, सदानंद गायकर, विलास चौलकर, मेघा कोळी, अतुल काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते भाईसाहेब टके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकाश जैन, चंद्रकांत गायकवाड, लियाकत कडवेकर, अनिल काळे, बाळासाहेब टके, विनायक गोळे, रियाज अधिकारी, जुगन जैन, राजेश पिंपळे, डॉ. हफिज, जवरुद्दीन सय्यद, प्रकाश मोरे, सुधाकर जवके, नितिन पत्की यांच्यासह अतुलदादा काळे मित्र मंडळ व विभागातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. 16 संघाने भाग घेतलेल्या या स्पर्धेमध्ये रात्री उशिरा संतोष कोळी,उद्य जवके,महेंद्र पोटफोडे,सचिन कळसकर, उदय दिवेकर, विनोद पाटील, अतुल काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या बक्षीस समारंभात प्रथम क्रमांक - जोगेश्वरी नगर B संघ यांना अतुल काळे पुरस्कृत भव्य राष्ट्रवादी चषक व रोख रु.05000/-, व्दितीय क्रमांक- कानिफनाथ मराठाआळी, B संघ यांना अतुल काळे पुरस्कृत भव्य राष्ट्रवादी चषक व रोख रु. 03000/-, तृतीय क्रमांक - देवलाई चिकणी संघ यांना अतुल काळे पुरस्कृत भव्य राष्ट्रवादी चषक व रोख रु.02000/-, चतुर्थ क्रमांक - जोगेश्वरी नगर A संघ यांना अतुल काळे पुरस्कृत भव्य राष्ट्रवादी चषक व रोख रु.02,000/- देऊन गौरविण्यात आले.यावेळी प्रमोद जांबेकर, दिपेंद्र आवाद, सुनील लाड,पवन पोलसानी,कुलदीप शहासने, गुड्डू मोदी,नीलेश म्हात्रे यांच्यासह विभागातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अतुलदादा काळे मित्र मंडळ व ओमकार क्रिकेट क्लबचे सर्व पदाधिकारी,सदस्य तसेच ग्रामस्थ मंडळ कोळीवाडा यांनी अपार मेहनत घेतली.

Popular posts from this blog