मनसे आमदार चषकाचे मानकरी वैशाली स्मृती,खारापटी
नागोठणे : महेंद्र माने
रोहा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना व नवनिर्माण सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 25 ते सोमवार 28 फेब्रुवारी दरम्यान वेलशेत येथील श्री जाखमाता क्रीडांगणात भव्य दिव्य झालेल्या क्रिकेट स्पर्धेत मनसे आमदार चषकाचे वैशाली स्मृती, खारापटी मानकरी ठरले आहेत.
मनसे रायगड जिल्हा संघटक प्रल्हाद पारंगे व रोहा तालुका सचिव साईनाथ धुळे आयोजक असलेले तसेच मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड यांच्यासह संदेश शेवाळे,मंगेश कामथे, द्याराम ताडकर, सुभाष मढवी,महेंद्र ताड़कर व क्रिकेटप्रेमींच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक- वैशाली स्मृती,खारापटी यांना भव्य आमदार चषक व रोख रु.1,00000/-, द्वितीय क्रमांक-श्री.बापदेव,वणी यांना भव्य आमदार चषक व रोख रु. 50,000/-, तृतीय क्रमांक- साई इलेव्हन, झिराड यांना भव्य आमदार चषक व रोख रु.25,000/-,चतुर्थ क्रमांक- धनविन स्पोर्टस,अलिबाग यांना भव्य आमदार चषक व रोख रु.25,000/- तसेच मालिकावीर व सामनावीर सलमान सिद्धीकी,खारापटी याला एलईडी टीव्ही व कूलर तसेच उत्कृष्ट फलंदाज सोनु सिंग-वणी, उत्कृष्ट गोलंदाज समर्थ कडू अलिबाग, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अनिकेत भोसले खारापटी यांना प्रत्येकी एक एक शूज देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत प्रतीक पाटील, शशांक पारंगे, दीपेश चोरंगे,राहुल पाटील, हिमालय पारंगे व जयेश बावकर यांनी पंच म्हणून काम केले, तर संतोष पाटील, कपिल ठाकुर, संतोष ताडकर व दीपक चोरगे यांनी उत्कृष्ट समालोचक केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रल्हाद पारंगे व साईनाथ धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे महिला सेना तालुकाध्यक्ष दीपश्री घासे,विभाग अध्यक्ष गोरखनाथ पारंगे, वेलशेत शाखाध्यक्ष आदेश पारंगे यांच्यासह नरेश भंडारी, शशांक पारंगे, मनोज पारंगे, भावना भोईर, स्वरा भंडारी, शीतल जगताप, पूनम डोलकर, संजय शहासने, प्रफुल पाटील व रोहन बावकर तसेच मनसे सैनिकांनी विशेष मेहनत घेतली.