पाटणूस म्हसेवाडी परिसरात गुरे दगावण्याचे सत्र सुरूच, आणखी तीन गुरे दगावली 

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

माणगांव तालुक्यातील पाटणूस म्हसेवाडी परिसरात गुरे दगावण्याचे सत्र सुरू असून पुन्हा तीन गुरे दगावल्याने आता दगावलेल्या गुरांची संख्या 15 वर पोहचली आहे. त्यामुळे गुरे मालक व परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आज पुन्हा गुरे दगावल्याने डॉ. कदम व सहाय्यक आयुक्त डॉ. डुबल व त्यांचे सहकारी यांना गुरे मालकांनी ताबडतोब कल्पना दिल्याने डॉक्टर डुबल, डॉ. कदम व त्यांची टीम घटना स्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीने गुरांचे अवयव काडून घेतले व ते शवचिकीत्सा करण्यासाठी पुणे येथे रवाना झाले. थोड्याच दिवसात शव चिकित्सेचा अहवाल येईल व गुरे कशामुळे दगावत आहेत त्याचे कारण समजेल व त्याप्रमाणे गुरांवर इलाज करण्यात येईल व इतर गुरांचे प्राण वाचविण्यास मदत होईल.  

गुरे दगावल्याचे कळताच गेले दोन दिवस प्रामुख्याने कमलेश चव्हाण, अनंता दळवी, आंदेश दळवी, पोलीस पाटील प्रदीप म्हामुणकर व गावातील अनेक ग्रामस्थांनी खूप धावपळ केली तलाठी, तहसील दार, आमदार यांच्यापर्यंत खबर देण्यात महत्वाची कामगिरी बजावली त्यामुळे डॉक्टरांची टीम वेळेत उपस्थित राहिल्याने चांगली मदत झाल्याने गुरे मालकांनी सर्वांचे विशेष आभार मानले. तलाठी काही कामानिमित्त बाहेर गेले होते ते दि. 24 मार्च 2022 रोजी उपस्थित राहून पंचनामा करणार असल्याचे माजी उप सरपंच आंदेश दळवी यांनी सांगितले. डॉ. डुबल यांच्या सल्ल्यानुसार दगावलेल्या सर्व गुरांना जे सी बी च्या सहाय्याने खड्डा करून दफन करण्यात आले आहे.

Popular posts from this blog