पाटणूस ग्रामपंचायतीच्या सरपंच नीलिमा निगडे आता अधिकृत सरपंच

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

माणगांव तालुक्यातील पाटणूस ग्रामपंचायतीच्या सरपंच नीलिमा निगडे यांना 11 मार्च 2022 रोजी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने व ते प्रमाणपत्र त्यांनी कोर्टात सादर केल्याने दि. 21 मार्च 2022 रोजी कोर्टाने त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र योग्य असल्याचा निर्णय दिला व त्यानुसार दि. 24 मार्च 2022 रोजी गटविकास अधिकारी श्रेणी 1 यांच्यामार्फत सरपंच नीलिमा निगडे यांना सरपंच म्हणून अधिकृतपणे पदभार सांभाळण्याची ऑर्डर दिली. ऑर्डर हाती येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला व त्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर नीलिमा निगडे यांना काही तांत्रिक अडचणी मुळे गेली तीन वर्ष अनेक अडचणी आल्या. परंतु हार न मानता त्यांनी जिद्द कायम ठेवली त्यामुळेच त्यांना सरपंच पद अधिकृत पणे मिळवीण्यात यश आले. 

त्यांचे पती संजय निगडे यांनी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मोलाची साथ दिली. नीलिमा निगडे या जात प्रमाणपत्र वैध असलेल्या अधिकृत उमेदवार आहेत याची खात्री पटल्याने मा. खाजदार तथा केंद्रीय मंत्री मा. तटकरे साहेब, आमदार अनिकेत तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे यांनी योग्य ते मार्गदर्शन केल्याने सरपंचबाईंना अखेर न्याय मिळाला. शिवाय राष्ट्रवादीच्या  कार्यकर्त्यांनी कायम त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांची उमेद कायम जागृत राहिली. 

दि. 25 मार्च 2022 रोजी पुन्हा एकदा सरपंच पदाची धुरा स्वीकारल्यानंतर सरपंच बाईंनी सर्वांचे आभार मानले. सरपंच पदाची तीन वर्ष फुकट गेल्याने पाटणूस गावचा विकास थांबला होता. परंतु अजूनही आपल्याकडे दोन वर्षे बाकी असून आपण गावचा विकास सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने जोमाने करू असे त्यांनी पदभार स्वीकारताना सांगितले.

यावेळी ग्रामसेवक सचिन पाटील, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मोरे, प्रकाश निजामपूर कर, सदस्यां स्वेता  म्हामुणकर , सुहासिनी सुतार, रिया निगडे, प्रतिभा बांदल, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय राणे, प्रवीण सावंत, जयदीप म्हामुणकर, कमलेश चव्हाण, संजय निगडे, रवींद्र निगडे तसेच ग्रामपंचायत  कर्मचारी व बहुसंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts from this blog