भाएसोच्या परमार महाविद्यालयाचे तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षेत घवघवीत यश
महाविद्यालयाची 100 % निकालाची परंपरा यावर्षीही कायम!
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस.एस.ओ.एस.पी डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या हिवाळी परिक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.यामध्ये इलेक्ट्रिकल विभागाची रुचिता वसंत पाटील हिने 86.70% गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम आली असून महाविद्यालयाची 100 % निकालाची परंपरा यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी राखली असल्याची माहिती अमरजा लिमये यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या हिवाळी परिक्षा 2021 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये महाविद्यालयाचा प्रथम वर्ष 84.14 %निकाल लागला असून यामध्ये आर्यन महेश माळी याला 79 % गुण मिळाले आहेत.इलेक्ट्रिकल विभागाचा 95.45 % निकाल लागला असून यामध्ये रुचिता वसंत पाटील हिला 86.70% गुण मिळाले आहेत, सिव्हिल विभाग 94.91 % निकाल लागला असून यामध्ये दिप्ती विष्णू भोय हिला 83.80% गुण मिळाले आहेत,, मेकॕनिकल विभाग 97.29 % निकाल लागला असून यामध्ये सुबोध उदय शिंदे याला 85.91% गुण मिळाले आहेत, तर कॉम्प्यूटर विभाग 96.77 % निकाल लागला असून यामध्ये ऋषभ खंडागळे याला 85.46 % गुण मिळाले आहेत.
महाविद्यालयाची 100 % निकालाची परंपरा राखण्यासाठी इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख ज्योती पालवे,सिव्हिल विभागप्रमुख रुपेश थळे, मेकॕनिकल विभागप्रमुख सुजित पाटील व कॉम्प्यूटर विभाग प्रमुख अस्मिता पाटील या सर्व विभाग प्रमुखांची अतिशय मेहनत घेतली असून कॉलेजचे प्राचार्य प्रविण भारती यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष किशोर जैन तसेच संस्थेचे सीईओ कार्तिक जैन यांनी अभिनंदन व त्यांच्या पुढील उज्ज्वल यशासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती अमरजा लिमये यांनी दिली.