खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते टाटा-वीजगृह-टेल-रेस ते पाटणूस ग्रामपंचायत नवीन जलवाहिनीचे भूमीपूजन
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
टाटा पॉवर भिरा जलविद्यूत केंद्रातर्फ़े टाटा पॉवर कंपनी आणि Tata AIA यांच्या संयुक्त विद्यमाने CSR फंडातून टाटा-वीजगृह-टेल-रेस ते पाटणूस ग्रामपंचायत नवीन जलवाहिनीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम टाटा विद्यालय भिरा येथे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते आणि महाड-रायगड विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. टाटा पॉवर कंपनीतर्फ़े सदरहू काम रू. 22 लक्ष निधीचा विनियोग करून करण्यात येणार असून सदरहू जलवाहिनीचा स्त्रोत पॉवरहाऊस च्या ठिकाणी म्हणजेच प्रदुषण-विरहीत स्वच्छ पाणी मिळेल अशा प्रकारे तसेच अशा उंचीवर जेणेकरून केवळ गुरूत्त्वाकर्षणाने सदरहू पाणीपुरवठा व्हावा अशा प्रकारे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी, टाटा पॉवर कंपनीचे जलविद्यूत विभागाचे प्रमुख श्री. प्रभाकर काळे साहेबांनी कंपनीतर्फ़े सामाजिक बांधिलकी अंतर्गत करण्यात येणा-या कामांचा थोडक्यात माहिती दिली.
मा. आमदार महोदयांनी टाटा पॉवर कंपनीचे देशाच्या प्रती असणा-या भरीव योगदानाबद्दल कंपनीचे कौतूक केले आणि मा. खासदार महोदयांनी टाटा पॉवर कंपनीने स्वातंत्र्यपूर्व काळात देश एकीकडे पारतंत्र्यात असताना दूसरीकडे विद्यूतनिर्मिती क्षेत्रात उतरून देशाच्या आर्थिक राजधानीचे विकासाला हातभार लावला आणि तसेच या प्रकल्पामुळे आणि उपलब्ध होणा-या पाण्यामुळे कोकण प्रदेशात विशेषत: रायगड जिल्ह्यात ज्याप्रकारे सिंचन, उद्योग आणि व्यवसायाचे भरभराटी झाली आहे त्याचे दाखले देत पूर्वेकडील भागात पाणी देण्याकरिता टाटाचे हे प्रकल्प बंद करण्याचा घाट मागील सरकारने घातला असलेविरूध्द येथिल लोकप्रतिनिधी म्हणून संघर्ष करीत राहणार आणी हे प्रकल्प जे देशाचे अभिमान आहेत बंद होऊ देणार नाही अशी खात्री यावेळी खासदार महोदयांनी व्यक्त केली.
यावेळी भिरा जलविद्यूत विभागाचे प्रमुख श्री अजय कोण्णूर, परिचलन विभागाचे प्रमुख श्री श्रीकांत कंदी, हायड्रो CSR चे प्रमुख श्री. मनोहर म्हात्रे आणि टाटा धरण प्रमुख- बसवराज मुन्नोळी इ. अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेना कार्यकर्ते माजी उप सभापती आप्पा म्हामूणकर, माजी सरपंच विजय म्हामुणकर, माजी उप सरपंच आंदेश दळवी, विभाग प्रमुख बापी म्हामुणकर, शाखा प्रमुख संकेत म्हामुणकर माजी शाखा प्रमुख केतन म्हामुणकर, सक्रिय कार्य कर्ते संतोष सुतार, जेष्ठ कार्यकर्ते अर्जुन सावंत, दिलीप राजिवडे, आत्माराम सावंत व बहुसंख्य शिवसेना कार्यकर्ते
व शिवसैनिक तसेच राष्ट्रवादी कार्यकर्ते सरपंच नीलिमा निगडे, उप सरपंच चंद्रकांत गुजर, कार्यकर्ते राहुल गुजर, विजय आंबवले, राजू गायकवाड, नंदकुमार निगडे, नंदकुमार चोरगे, चैतन्य गायकवाड, निसर्ग गुजर, योगेश बांदल, मंदार गायकवाड, काशिनाथ गुजर, जितेंद्र सुर्वे, प्रफुल्ल चोरगे, दिपक ओव्हाळ, मेजर बांदल, सुनील मारणे, निजामपूर विभागीय अध्यक्ष देविका पाबेकर, माजी सरपंच पूजा म्हामुणकर, टाटा सि एस आर शर्मिला गोळे व त्यांचे सहकारी, व बहुसंख्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.