माणगांव पोलीस ठाणे पोलीस निरिक्षक पदावर राजेंद्र पाटील यांची नियुक्ती
पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांची बदली
माणगांव : प्रमोद जाधव
माणगांव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अश्वनाथ खेडकर यांची बदली अलिबाग येथे प्रभारी अधिकारी जिल्हा वाहतुक शाखा रायगडला झाल्याने आता माणगांव पोलीस स्टेशनचा पदभार पूर्वी जिल्हा वाहतुक शाखेत प्रभारी असलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र पांडुरंग पाटील यांनी स्विकारला आहे. त्यांची रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांचे आदेशानुसार नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
माणगांवमधील आपल्या वर्षभराच्या सेवा काळात पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी माणगांवमध्ये शांतता व सुव्यवस्था राखली. जनतेशी सौजन्य पूर्ण पोलीस-मैत्रीचे नाते जपले होते. ट्रॅफिक तसेच गुन्हेगारी विशेष म्हणजे कोरोना संकट काळातील जवळपास अखेरच्या टप्प्यातील सर्व परिस्थिती काळजीपूर्वक हाताळणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्याप्रमाणेच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याकडूनही माणगांवकरांना सहकार्याची अपेक्षा आहे.
आज पहिल्यांदाच माणगांव तालुका पत्रकार सेवा संघाचे पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र कुवेसकर यांच्या समवेत माणगांव तालुका पत्रकार सेवा संघाचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, सचिव सुनिल राजभर, खजिनदार परेश शिंदे, सहखजिनदार वैभव सत्वे ,ज्येष्ठ सल्लागार अनिल मोकाशी, सदस्य रायगड टाईम्स चे पत्रकार निरंजन कळस, दैनिक लोकमत चे तालुका प्रतिनिधी गिरीष गोरेगावकर, पोलीस प्रवाह चे पत्रकार नचिकेत म्हापसेक व पत्रकार अमित जाधव या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी नावनियुक्त पोलिस निरिक्षक राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करीत माणगांवमध्ये मनःपूर्वक स्वागत केले. पाटील यांनीही पत्रकारांशी बोलताना माणगांवकरांकडुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्यात येण्यापूर्वी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे दापोली, जि. रत्नागिरी येथे कार्यरत होते. ज्येष्ठ नागरिक आणि महिला सुरक्षा विषयक विशेष प्रयत्न करण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला असुन आदिवासी समाजासाठी चांगले मदतकार्य करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करुयात असेही त्यांनी विश्वासाने आपले मत व्यक्त केले.