रोहा-चणेरा मार्गावर पिकअप गाडी पलटी
गोफण/रोहा : रोहित कडू
रोहा-चणेरा मार्गावर पिकअपगाडी पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवीतहानी झाली नाही, मात्र चालक किरकोळ जखमी झाला आहे.
रोहा-चणेरा मार्गावर पिकअप क्र. MH.06.G.9105 ही गाडी चणेरा परिसरातील खैराळे येथील आहे. ही गाडी चणेरा ते रोहा विट सप्लाय करत असताना आज दिनांक ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २:४० च्या सुमारास चणेरा कडून रोहा कडे विटा घेऊन जात असताना गोफण येथे या पिकअप चा टायर पंक्चर झाल्यामुळे पिकअप चालकाचे नियंत्रण सुटून आपघात झाला व गाडी पलटी झाली.
या आपघातात सुदैवाने जीवीतहानी झाली नाही, मात्र पिकअप चालक किरकोळ जखमी झाला आहे.