कोलाड मध्ये मटका-जुगार माफीयांचा धुमाकूळ! 

कोलाडच्या पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता?

अवैध मटका-जुगार व चक्री जुगाराला पाठींबा देणारे पोलीस अधिकरी सुभाष जाधव यांना निलंबीत करण्याची मागणी 

इतक्या तक्रारी वाढून देखील कोलाडच्या पोलीसांनी लाज सोडलीय का? नागरिकांचा सवाल

गृहमंत्री व पोलीस महासंचालकांनी कारवाई करण्याची मागणी

रायगड : प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील कोलाड येथे मटका माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून पोलीसांना येथील पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध मटका जुगारावर व ऑनलाईन चक्री जुगारावर पोलीस कारवाई करीत नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे.

येथील अवैध चक्री जुगार व मटका जुगाराचे धंदे पाहता कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे दिसत असून या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आल्याचे स्पष्ट होत चालले आहे. कोलाडचे पोलीस सुधरणार कधी? यांनी लाज सोडलीय का? असा प्रश्न या परिसरातील नागरिक व महिला वर्गाकडून केला जात आहे.

येथे मटका जुगार जोमात सुरू असल्यामुळे पोलीसांना सध्या सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात आहे. येथील बेकायदा मटका जुगारामुळे पोलीसांच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याचे चर्चिले जात असून या परिसरात पोलीसांच्या कार्यपद्धतीचे धिंडवडे निघू लागले आहेत. परिणामी महाराष्ट्राचे गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांनी अवैध धंद्यांना पाठबळ देणारे पोलीस अधिकारी सुभाष जाधव यांच्यावर प्रथम कारवाई करून त्यांना निलंबीत करण्याची मागणी संपूर्ण तालुक्यातून जोर धरू लागली आहे.

Popular posts from this blog