पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते स्वयंभू सोमनाथ मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा संपन्न
चणेरा/रोहा : रोहित कडू
रोहा तालुक्यातील तसेच चणेरा विभागातील सारसोली गावच्या स्वयंभू सोमनाथ मंदिराचा सोहळा रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
तसेच रायगडचे खासदार सुनिलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांनी यात्रा स्थळांचा विकास या योजनेतून मंजूर झालेल्या सारसोली येथील स्वयंभू सोमनाथ मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा २८ फेब्रुवारी २०२२ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच सारसोली ग्रामस्थ व महिला आणि विभागातील कार्यकर्ते यांनी स्वयंभू सोमनाथ जिर्णोद्धाराचे स्वागत केले.
याप्रसंगी मधुकर पाटील, रामचंद्र सकपाळ, विनोद पाशिलकर, हरिश्चद्र वाजंत्री, हसमुख जैन, संतोष सिनकर, लक्ष्मण वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.