रोहा तहसिल कार्यालयाच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था!
शौचालयाची दुर्गंधी, रोगराई पसरण्याची शक्यता
रोहा : समीर बामुगडे
रोहा तहसिल कार्यालयाच्या स्वच्छतागृहाची प्रचंड दुरवस्था झालेली असून या परिसरात शौचालयाची दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
रोहा तहसिल कार्यालयाच्या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडेच दुर्लक्ष झाल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरू लागली असून येथील अवस्था पाहण्यासारखी राहिलेली नाही. येथील कर्मचाऱ्यांना नेहमीच दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. हे स्वच्छतागृह रोहा तहसिल कार्यालयाच्या प्रांगणातच असल्यामुळे येथे नेहमी येणाऱ्या नागरिकांना व शासकीय कर्मचाऱ्यांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत असून यामुळे नागरिकांच्या व शासकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही!
या स्वच्छतागृहाची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.