माणगांव येथे नगरपंचायत सफाई कामगारांची बैठक संपन्न, प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा
धाटाव/रोहा : किरण मोरे
विलास सोलंकी यांनी माणगाव नगरपंचायत सफाई कामगारांची बैठक माणगांव शासकिय विश्राम गृह येथे घेतली. त्यावेळी प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा केली. महाराष्ट्र राज्य शासनाने परिपत्रक काढून दोन महिने झाले तरी कामगारांना सामावेसन पासून वंचित राहावे लागत आहे. अनेक वर्षांपासून त्यांचे नुकसान होत आहे. सामावेसन झलेले नसल्याने सफाई कागारांचे लाभापासून नुकसान होत आहे. त्यात त्यांच्या सामावेसन चे कामकाज सुरू होतच नाही. नगर पंचायतीचे सफाई कर्मचारी यांना समावेसान करून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.
ना. मुकेश सारवान शिवराज्य सफाई कर्मचारी सेना (रजि) चे अध्यक्ष आणि (प्र) अध्यक्ष राज्य मंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य शासन सफाई कर्मचारी आयोग महाराष्ट्र राज्य यांची लवकरात लवकर माणगांव तालुक्यातील सफाई कामगारांची भेट घेणार असे सभेमध्ये शिवराज्य सफाई कर्मचारी सेना महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा अध्यक्ष विलास सोलंकी यांनी जाहीर केले आहे.