मराठी राजभाषा दिनानिमित्त को.म.सा.प. शाखा रोहा व भाटे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने "निवडक कुसुमाग्रज" कार्यक्रम संपन्न
रोहा : किरण मोरे
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहा व भाटे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २७ फेब्रुवारी 2022 रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त "निवडक कुसुमाग्रज" या कार्यक्रमाचे आयोजन भाटे वाचनालय रोहा येथे करण्यात आले होते.
कार्यकमाचे अध्यक्ष श्री मकरंद बारटक्के, रायगड जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कुसुमाग्रजांच्या साहित्या विषयी बोलताना ते म्हणाले की "नटसम्राट" सारख्या एखाद्या नाटकातील एक जरी संवाद ऐकला तरी आपला आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होतो. ध्येय श्रेष्ठ असेल तर तो मनुष्य आपल्या ध्येयाने श्रेष्ठ होतो. आपल्या प्रत्येक संकल्पाप्रती आपली आत्मियता हवी. उत्तम साहित्य आपल्याला संस्कारीत करतात. चांगले साहित्य वाचले तर येणारी पिढी नक्कीच संस्कारी होईल असा विश्वास त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.
को. म. सा. प. शाखा रोहाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ.. संध्या दिवकर यांनी प्रास्ताविकात कुसुमाग्रजांचे साहित्य आपल्याला जगण्यास शिकवते, प्रेरणा देते असे सांगितले .
सदर कार्यक्रमास सुधीर क्षीरसागर, नारायण पानवकर, बाबाजी धोत्रे, श्वेता रिसबुड, विजय दिवकर, वृशाली देशमुख, वर्षाराणी मुंगसे, घाग सर ,सुप्रिया क्षिरसागर, घोडींदे मॅडम, निकीता बोथरे, वृद्धी भगत, स्वराज दिवकर यांनी कुसुमाग्रजांचे निवडक लेख व कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. श्री किशोर तावडे, अध्यक्ष, भाटे सार्वजनिक वाचनालय रोहे यांनी आपले मनोगत मांडले.
या कार्यक्रमास पत्रकार श्री. सचीन साळुंके व श्री हजारे उपस्थित होते. रायगड भूषण सुखद राणे व भाटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष किशोर तावडे यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संध्या दिवकर यांनी सांगितले. या कार्यकमासाठी सुखद राणे, किशोर तावडे, सौ. संध्या दिवकर, महेश कुलकर्णी ,विजय दिवकर, शरद कदम यांनी विशेष मेहनत घेतली. सुत्रसंचालन नारायण पानवकर व निकीता बोथरे यांनी केले. तरआभार सुधीर क्षीरसागर यांनी मानले .