मोरे महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनीची रोहा एमआयडीसी येथे क्षेत्रभेट
गोफण/रोहा : रोहित कडू
एम बी मोरे महिला महाविद्यालयातील तृतीय वर्ष विज्ञान (रसायनशास्त्र) वर्गातील विद्यार्थिनींची रोहा एमआयडीसी मधील बेक केमिकल्स येथे दि ०४ आणि ०५ फेब्रुवारी २०२२ रोजी शैक्षणिक क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली. महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थिनींना 'पाणी शुद्धीकरण प्रक्रिया' या सर्टिफिकेट कोर्स अंतर्गत क्षेत्रभेटीमध्ये प्रत्यक्ष कंपनीच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पा (इटीपी प्लांट) ची माहिती देण्यात आली.
बेक केमिकल्सचे इटीपी प्लांटचे प्रमुख संतोष अधिकारी आणि कर्मचारी श्री अमित पाटील, श्री किरण मोरे यांनी प्लांट च्या कामासंबंधी प्रात्यक्षिक दिले आणि दैनंदिन इटीपी बाबत प्लांटवरील केल्या जाणाऱ्या नोंदीची माहिती दिली. तृतीय वर्ष विज्ञान (रसायनशास्त्र) वर्गातील ३५ विद्यार्थिनी आणि प्रा. प्रतीक्षा घारगे, प्रा. निकीता महाडिक, प्रा. प्रतिमा भोईर आणि प्रा. ममता बिंद यांनी क्षेत्रभेटीत सहभाग घेतला होता. या क्षेत्रभेटीचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रसन्न म्हसळकर आणि सर्टिफिकेट कोर्स कमिटीच्या प्रमुख प्रा. प्रतीक्षा घारगे यांनी केले.