लायन्स क्लबचा झोन टू झोन सोशल गेट टूगेदर झोनच्या वतीने सन्मान

कोलाड : निलेश महाडीक

इंटरनॅशनल लायन्सक्लब डिस्ट्रिक्ट ३२३१ A झोन २ रिजन ३: झोन टू चा सोशल गेट टुगेदर जिल्हा प्रांतपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच खांब येथे मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.

लायन्सक्लब चे झोन चेरपर्सन लायन रविंद्र घरत व सौ रोहिणी घरत यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला एम जे एफ लायन लुणकरन तावरी जिल्हा प्रांतपाल ,एम जे एफ लायन अमरचंदजी शर्मा जिल्हा द्वितीय प्रांतपाल,एम जे एफ लायन अनिल जाधव माजी जिल्हा प्रांतपाल तथा जिल्हा ऍडव्हाजर,एम जे एफ लायन अरविंद घरत रिजन चेअरम रिजन थ्री,लायन लता भाभी, एम जे एफ भरत दत्त जी एम टी जिल्हा आडवायझर,लायन प्रियदर्शनी पाटील झोन फास्ट चे झोन चेअरपर्सन,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

सौ रोहिणी व लायन श्री रविंद्र घरत यांच्या वतीने व लायन्सक्लब च्या सहकार्याने आयोजित केलेल्या या झोन सोशलमध्ये लायन्सक्लब डिस्ट्रिक्ट चे पदाधिकारी व लायन्सक्लब ऑफ रोहा, नागोठणे, कोलाड , रोहा, महाड, श्रीबाग अलिबाग, लियो युथ रोहा, आदी क्लबचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी सह कुटूंब सह परिवार सहभागी व उपस्थितीत होते. यावेळी सर्व क्लबच्या अध्यक्षांनी आपण केलेल्या विविध सामाजिक कामांचा आढावा देत पुढील काळातील आयोजित करण्यात येणाऱ्या कामांचे आश्वासन दिले.

उत्स्फुर्त प्रतिसाद लाभलेल्या या इंटरनॅशनल लायन्सक्लब डिस्ट्रिक्ट ३२३१ A झोन २रिजन ३ झोन टू चा सोशल गेट टुगेदरच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन स्वागत गीत मान्यवरांचे स्वागत व मनोगत झोनमधील सहभागी असलेल्या क्लबचे सन्मान व त्यांना प्रमाणपत्र देत इत्यादी कार्यक्रमांनी करण्यात आली तद्नंतर सर्व क्लब चा सन्मान व खास आकर्षण स्वरसाद प्रस्तुत मराठी, हिंदी, गाण्यांचा बहारदार कार्यक्रम विशाल चोपडे यांनी सादरीकरणचा आनंद घेत प्रसंगी विविध प्रकारचे फनी गेम्सचा आनंद लायन्सक्लब च्या उपस्थितीत असलेल्या सह परिवाराने लुटला.

Popular posts from this blog