रोहा सब रजिस्टर कार्यालयाला दलालांचा विळखा?
रोहा : समीर बामुगडे
रोहा तालुका आत्ता तिसरी मुंबईच्या दिशेने वाटचाल करत असुन तालुक्यातील जमिनीचे भाव वधारले त्यातच रोहा तालुक्याच्या ग्रामीण भागात जमिनीचे खरेदी विक्रीचे प्रकार वाढले असल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या उद्योगाला सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे. कोरोना महामारीच्या संकटात दोन वर्षे लॉकडाऊन काळात खरेदी -विक्रीचे व्यवहार कमी झाले असले तरी अनलॉक काळात आजही मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे केंद्र म्हणुन रोहा रजिस्ट्रर कार्यालयाला सुद्धा सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात आहे.
मात्र तेथे सर्वसामान्य नागरिकांना खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी दलालांचा आसरा घ्यावा लागतो. रोहा रजिस्ट्रर कार्यालयातील अधिकाऱ्यांचा या दलालांवर वरदहस्त असल्यामुळे दलालांशिवाय येथे सर्वसामान्यांची कामे होत नसल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाकडुन केल्या जात आहेत. दलाल यांच्याकडे कामे दिल्यावर कामाच्या व्यतिरिक्त भरमसाठ पैसे कागदपत्रे तसेच स्टँम्प पेपरच्या नावाने उकळले जात असल्याने सर्वसामन्य माणूस या गैरप्रकारांना हैराण झाला असुन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडुन रोहा रजिस्ट्रर कार्यालयातील कार्यरत अधिकारी तसेच कार्यालयात वावरणारे दलाल यांच्यावर कारवाई होत नसल्याने आचर्य व्यक्त केले जात आहे.