रोहा येथे कुपोषित बालकांना पोषण पोटलीचे वाटप
रोहा : किरण मोरे
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्धारातून आदिवासी बांधवांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केलेल्या सप्तसुत्री कार्यक्रमाचे प्रभावी अंमलबजावणी चा भाग म्हणून एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत अन्नदान ऑर्गनाइजेशन तर्फे स्वामीराज फाउंडेशन च्या माध्यमातून रोहा तालुक्यातील एकूण आंगणवाडी केंद्रातील 6 महीने ते 6 वर्ष वयोगटातील कुपोषित बालकांना 300 पोषण पोटली चे वाटप पंचायत समिती रोहा येथे झाले. सदर कार्यक्रम रायगड़ जिल्ह्यात गेल्या महिन्यापासुन चालू आहे. उत्तम आहार व शिक्षणाचे महत्व या कार्यक्रमात समजावण्यात आले. आदिवासी बांधवाना प्रगतीच्या प्रवाहात आणण्याचे सतत प्रयन्त करू असे प्रतिपादन रोहा तहसीलदार यानी केले. सदर कार्यक्रमाला रोहाचे तहसीलदार कविता जाधव, पंचायत समिती बीडीओ, अन्नदाचे श्री संजय सर, रोहा आंगणवाडी बीट सुपरवायर सौ घाडगे, स्वामीराज फाउंडेशन चे अध्यक्ष श्री जयेश माने, उपाध्यक्ष दीपक माळी, महिला सक्षमीकरण विभाग अध्यक्ष सौ. संजीवनी माने, तालुक्यातील सर्व आंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.