नोकरीचे आश्वासन देऊन केली फसवणूक, कंपनीने दिलेले आश्वासन हवेतच विरले!

विद्या नरेश भगत यांचे ८ मार्च रोजी बेक केमिकल कंपनीसमोर उपोषण

रोहा : किरण मोरे

पतीच्या निधनानंतर महिलेला नोकरीमध्ये सामावून घेण्याचे आश्वासन देऊन देखील बेक केमिकल कंपनीच्या व्यवस्थापनाने नोकरीमध्ये सामावून न घेतल्यामुळे विद्या नरेश भगत या महिलेने येत्या ८ मार्च पासून बेक केमिकल कंपनीच्या गेट समोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्या नरेश भगत यांचे पती नरेश दत्ताराम भगत हे बेक केमिकल प्रा. लि. धाटाव, ता. रोहा येथे कायम स्वरूपी नोकरीस होते. त्यांचे कोरोना या आजारामुळे दि. २७ जुलै २०२० रोजी मुंबई येथे हॉस्पिटलमध्ये उपचाराअंती निधन झाले. त्यांना एक सहा वर्षाची लहान मुलगी आहे. अशा मोठ्या दुःखात असताना विद्या नरेश भगत यांना बेक केमिकल कंपनीमध्ये बोलावले त्यावेळी कंपनीचे अधिकारी श्री. आठवले यांनी त्यांना नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले व तुटपुंजी रक्कम देऊन फसवणूक केली.

"जोपर्यंत मला माझ्या पतीच्या जागेवर कंपनी नोकरीत घेत नाहीत व उर्वरीत रक्कम मला देत नाहीत तोपर्यंत मी माझ्या सहा वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन आंदोलन सम्राट श्री किशोरभाई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बेक केमिकल कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर मंगळवार, दि. ८ मार्च २०२२ रोजी बेमुदत उपोषणास बसणार आहे. माझे व माझ्या मुलीचे या उपोषणातून काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबीवदार बेक केमिकल कंपनीचे अधिकारी श्री. आठवले व कंपनीचे व्यवस्थापन राहील याची कृपया नोंद घ्यावी" असे निवेदन विद्या नरेश भगत यांनी जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधीक्षक रायगड, तहसिलदार रोहा, उपविभागीय अधिकारी (प्रांत) रोहा, उपविभागीय पोलीस अधिकारी (S.D.P.O.) रोहा, पोलीस निरीक्षक रोहा यांना दिले आहे. 

दरम्यान, या उपोषणामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाला जाग येईल का? याबाबत या परिसरात एकच चर्चा आहे!

Popular posts from this blog