युक्रेन देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील नागरिकांविषयी माहिती सादर करणेबाबत
अलिबाग : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन देशांमध्ये परिस्थिती निर्माण झाली असून युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेन देशामध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील नागरिकांची माहिती देण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. त्यानुसार ज्या नागरिकांचे नातेवाईक युक्रेन या देशामध्ये शिक्षण, व्यवसाय, नोकरी, पर्यटन इ. कारणांकरिता गेल्यामुळे तेथेच अडकून पडले आहेत, अशा नागरिकांची माहिती त्यांचे नातेवाईकांनी जवळच्या तहसिलदार कार्यालयामध्ये किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141-222097, 8275152363 या क्रमांकावर कळवावी.
तसेच याबाबत केंद्रीय पराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली येथे नागरिकांच्या माहितीसाठी व मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून तेथील हेल्पलाईन नंबर 1800118797 (टोल फ्री) 011-23012113, 011-23014104, 011-23017905, Fax no.-011-23088124 / Email ID : situationroom@mea.gov.in याप्रमाणे आहे.
तरी रायगड जिल्हयातील कोणी नागरिक युक्रेनमध्ये अडकले असल्यास त्यांचे नातेवाईकांनी उक्त नमूद दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिली.