नागोठणे येथे मुमुक्षु दीक्षार्थी दिशीबेन यांच्या वर्षीदान शोभायात्रा संपन्न

गोर गरीबांना केले कपडे व वस्तूंचे वाटप

नागोठणे : महेंद्र माने 

येथील किशोर जुगराज जैन (पेणवाले) यांच्या वतीने मु. कोईमत्तूर  जिल्हा तामिळनाडू येथील निवासी मुमुक्षु दीक्षार्थी दिशीबेन किशोरजी राठोड यांचा भव्य वर्षीदान वरघोडा (रथातून शोभायात्रा) सोमवार 21 फेब्रुवारी रोजी काढण्यात आली. किशोर जैन यांच्या घरापासून वाजत गाजत, भक्ति गीत म्हणत दिशीबेन यांना घोडा गाडीमध्ये बसवून निघालेली शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येऊन आलेल्या मार्गाने जैन मंदिरात समाप्त झाली.यावेळी जि.प. सदस्य किशोर ओटरमल जैन, जैन समाज अध्यक्ष प्रकाश सरेमल जैन, सुरेश जैन, कोईमत्तूर निवासी सुकनराज राठोड तसेच संपूर्ण राठोड परिवारासह जैन समाज व चातुर्मास कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, मित्र परिवार, समाज बांधव व  महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील शोभायात्रेत दिशीबेन यांच्या हस्ते गोर गरीब जनतेला वस्तूंचे व कपड्यांचे वाटप करण्यात आले. वयाच्या 22 व्या वर्षी दीक्षा घेणार्‍या दिशाबेन यांना क्षीणमोहाश्रीजी मारासाबजी यांच्या पावन सानिध्यात 21 मे 2022 रोजी दिक्षा कार्यक्रम सूरत- गुजरात येथे होणार असल्याची माहिती किशोर जैन यांनी दिली.

Popular posts from this blog