आजच्या तरुण पिढीने शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा - किशोर जैन
भा.ए.सो.मध्ये कु.आर्यन बर्डे याच्या शिवविचार मंथनने शिवजयंती साजरी
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इयत्ता 4 थी मधील कु. आर्यन बर्डे याच्या शिवविचार मंथन कार्यक्रमाने 19 फेब्रुवारी रोजी साजरी झालेल्या शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी आजच्या तरुण पिढीने शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा; असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष किशोर जैन यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणा आर्यन बर्डे,संस्थेचे खजिनदार सुरेश जैन,संस्थेचे सीईओ कार्तिक जैन,कॉलेजचे प्राचार्य प्रविण भारती,कार्यालयीन व्यवस्थापक वैभव नांदगांवकर तसेच इलेक्ट्रिकल,मेकॕनिकल,सिव्हिल व कॉम्पुटर या चारही विभागाचे एचओडी तसेच विद्यासंकुलनातील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
भाएसोच्या डिप्लोमा कॉलेजमधील शिवजयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले. यामध्ये सकाळी जाखमाता मंदिरातून बाईक रॅली व शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करुन पालखीतून वाजतगाजत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. सदरील मिरवणूक कॉलेजमध्ये आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पालखीचे स्वागत व पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणा देत कॉलेजच्या इमारतीवरुन छ.शिवाजी महाराज यांचा भव्य बॕनर झळकवण्यात आला. छ.शिवाजी महाराजांची आरती झाल्यानंतर इयत्ता 4 थी मध्ये शिकत असलेल्या कु.आर्यन बर्डे याने शिवविचार मंथन हा कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना मेकॕनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती, चलचित्र राजमुद्रा या ऐतिहासिक गोष्टींवर आधारित असा छ.शिवाजी महाराज यांचे उत्कृष्ट प्रतिकृती सादर केल्याबद्दल कौतुक केले. कु.आर्यन बर्डे याने इतक्या लहान वयात किल्ले संवर्धनाचे काम करत असून याच्या आजच्या शिवविचार मंथन हा कार्यक्रमातून आत्ताच्या तरुण पिढीला प्रेरणा नक्कीच मिळेल असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत असून त्यांचाआदर्श आजच्या तरुण पिढीने अंगी बाळगायला हवा असल्याचे प्रतिपादन किशोर जैन त्यांनी शेवटी केले. दुपारच्या सत्रात महाप्रसाद झाल्यानंतर चारही विभागाच्या विद्यार्थ्यांने पोवाडा,वकृत्व स्पर्धा,पथनाट्य,गीत व नृत्य असे विविध कलादर्शन सादर करुन अनेक बक्षिसे पटकावली. आर्यन बर्डे तसेच विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.