माणगांवमध्ये मराठा कर्मचारी मित्रमंडळाकडुन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
माणगाव : प्रमोद जाधव
माणगांवमध्ये मराठा कर्मचारी मित्र मंडळ व शिवभक्त परिवार मराठा समाज युवा मंच माणगाव कडून १९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मराठा कर्मचारी मित्रमंडळाकडून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. त्यापैकी हे १५ वे वर्ष होते. १८ फेब्रुवारी रोजी मराठा समाज भवन माणगांव येथे जमून व त्यानंतर दुर्ग दुर्गेश्वर रायगड येथे जाऊन स्वराज्य सहयाद्री ग्रुप कडुन शिवज्योत आणण्यात आली व माणगाव मध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते शिवज्योत पूजन करण्यात आले.
या शिवजयंती उत्सवाचे आयोजना व नियोजनामध्ये मराठा कर्मचारी मित्र मंडळ अध्यक्ष धनाजी जाधव सर, कार्याध्यक्ष नितीन साबळे,उपाध्यक्ष प्रतापसिंह देशमुख,महादेव बावचकर,सचिव अंबादास चितळे,व सन्मानिय सदस्य व पदाधिकारी आणि मराठा कर्मचारी मित्रमंडळाच्या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, कार्याध्यक्ष लक्ष्मण वालगुडे, उपाध्यक्ष आनंद थोरात, राकेश सावंत,सचिव हनुमंत शेळके व सर्व संचालक व सर्व पदाधिकारी सदस्य आणि क्षत्रिय मराठा समाज युवा मंच व क्षत्रिय मराठा समाज अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सर्व शिवभक्त परिवार माणगांव तालुका यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला.
सायंकाळी माणगाव मधील बालाजी मंदिर येथे शिवप्रतिमेचे पूजन मराठा कर्मचारी मित्रमंडळ व मराठा समाज युवा मंच च्या हस्ते करण्यात आले व सायंकाळी ४ वाजता बालाजी मंदिर माणगांव ते अशोकदादा साबळे विद्यालय पटांगण पर्यंत शोभायात्रा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत मुंबई भायंदर येथील लेझिम पथकाने नृत्याविष्कार दाखवला. सोबतच सर्व शिवभक्त देखील नृत्यात सामील झाले. तर अबाल वृद्धांनी बनाठी (काठी)चे प्रात्याक्षिक दाखविले. मुंबई गोवा मार्गावरून ही शोभायात्रा काढण्यात आली व त्यानंतर सायंकाळी ७ वाजता अशोकदादा साबळे विद्यालयाच्या रंगमंचावर कार्यक्रम घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, माणगांव नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, शेकाप माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे व माणगांव तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी माणगांव नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नागरसेवकांचा सत्कार करण्यात आला व मराठा कर्मचारी मित्रमंडळाकडुन दरवर्षी देण्यात येणारा शिवभूषण पुरस्कार यावर्षी माजी सभापती गजानन अधिकारी यांना प्रदान करण्यात आला. यानंतर झी युवा सिंगर एक नंबर महाविजेता शाहीर महाराष्ट्राचा शिवशाहीर संतोष साळुंके व सहकारी (लातूर) यांचा सर्व शिवभक्तांच्या मनाला स्फूर्ती देणारा शिवचरित्र पोवाडे व स्फूर्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
माणगांव तालुक्यातील सर्वात मोठा समजला जाणारा व सलग १५ वर्षाची परंपरा हा शिवजयंती चा महाउत्सव साजरा करण्यासाठी माणगाव तालुका मराठा कर्मचारी मित्रमंडळाचे अध्यक्ष धनाजी जाधव सर व सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद देशमुख व त्यांचे सहकारी सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी व मराठा समाज युवा मंच चे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रचंड मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार बगडे सर, भानुदास बिरादार सर व धनाजी जाधव सर यांनी केले.