सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात ना. मुकेशजी सारवान यांनी केली माणगांव मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा

रोहा : किरण मोरे

रायगड जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात व आगामी सफाई कर्मचारी विभागीय मेळाव्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे माजी (प्र) अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा महाराष्ट्र शासन ना. मुकेशजी सारवान हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी माणगांव नगरपंचायतीला भेट देऊन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याशी विविंध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली.

मुकेशजी सारवान यांचे माणगांव नगरपंचायतीमध्ये आगमन झाल्यानंतर माणगांव नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, मुख्याधिकारी राहुल इंगले व शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष विलास सोलंकी यांनी सारवान यांचे स्वागत केले. मुख्याधिकारी यांच्या दालनात झालेल्या आढावा बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे नगरपंचायतीमध्ये समावेशन करावे, तसेच लाड पांगे या योजनेचा लाभ मिळण्यात यावा. तसेच सफाई कर्मचारी वर्ग ३ व वर्ग ४ करिता शिक्षणाची अट चौथी व शिपाई करिता सातवी पर्यंत ठेवावी. यावेळी जिल्ह्यातील एकही सफाई कर्मचारी नगरपालिकेतील समावेशनापासुन वंचित राहणार नाहीत याची ग्वाही मुकेशजी सारवान यांनी येथिल सफाई कर्मचाऱ्यांना दिली. यावेळी रायगड जिल्ह्यातुन आलेल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे मुद्दे ऐकून घेतले.

या आढावा बैठकीला महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा  श्री. मुकेशजी सारवान, शिवराज्य कर्मचारी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष विलास सोलंकी, माणगांव नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, मुख्याधिकारी राहुल इंगले, रोहा नगरपरिषद युनियन अध्यक्ष सचिन दळवी, शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेचे कल्याण-डोंबिवली विभागाचे अध्यक्ष अशोक गणपत भोईर, सामाजिक कार्यकर्ते अजित पवार, उमेश चव्हाण, तसेच रायगड जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकेतील सफाई कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog