माणगांवमध्ये नाट्यमय राजकिय घडामोडी!
खासदार तटकरेंना देखील सर्व निर्णय पवारांना विचारूनच घ्यावे लागतात - ज्ञानदेव पवार
मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... गरजले माजी नगराध्यक्ष आनंद यादव
माणगांव : प्रमोद जाधव
माणगांव नगर पंचायतीवर शिवसेना पुरस्कृत माणगांव विकास आघाडीने १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि तटकरेंच्या साम्राज्याला मोठा हादरा दिला. या विजयाचे शिल्पकार आ. भरत गोगावले, माजी शिक्षण सभापती ऍड. राजीव साबळे आणि ज्ञानदेव पोवार हे ठरले. गेल्या १५ दिवसात माणगांवमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. तसेच प्रचंड राजकीय दबाव राष्ट्रवादी पक्षाने आणला होता. परंतु, राजकीय दबावाला बळी न पडता माणगांव विकास आघाडी तर्फे ज्ञानदेव पोवार आणि प्रशांत साबळे यांनी आपले नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. खा. तटकरे यांनी विविध राजकीय क्लुप्त्या वापरण्याचा प्रयत्न करून पाहिल्या. परंतु, स्वर्गीय माजी आमदार अशोकदादा साबळे यांच्या मुशीत वाढलेले आणि त्यांचे सुपुत्र उगवते तरुण नेतृत्व शिवसेनेचे राजीव साबळे यांनी त्यांच्या दबावाला बळी न पडता तसेच आपले सर्व राजकीय वजन वापरून नगराध्यक्ष पदासाठी ज्ञानदेव पोवार यांचे नाव सुचविले. त्यानंतर ज्ञानदेव पोवार यांनी ना. सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला.
माणगांव नगर पंचायत ५ वर्ष ही राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. मात्र जनतेने माणगांव विकास आघाडीवर विश्वास दाखवून भरभरून मतदान केले. आणि आघाडीचा १७ पैकी ९ जागांवर विजय झाला. ज्ञानदेव पोवार हे पूर्वी काही वर्षे शिवसेनेचतच मोठ्या पदावर होते. परंतु, राजकीय समिकरणामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरल्यानंतर त्यांनी लगेचच शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. माणगांवचा विकास करण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे. यापुढे माणगावचा विकास हाच शिवसेनेचा ध्यास असेल असे प्रतिपादन ज्ञानदेव पोवार यांनी शिवसेनेत दाखल होताना केले.
या निवडणुकीत माणगांव विकास आघाडीने वचननामा प्रसिद्ध केला होता. त्यांची पूर्तता करण्यासाठी ना. सुभाष देसाई यांनी प्रयत्न करावेत. तसेच विविध विकास योजना आणून माणगांवचा विकास साधणार आहोत. शिवसेनेचे आता ९ सदस्य आहेत. पाच वर्षानंतर ९ चे १७ होतील. अशी विकासकामे करून जनतेचा विश्वास संपादन करू. असे ऍड. राजीव साबळे यांनी सांगितले. यापूर्वी काही काळ या नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. मात्र पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आली. आता मात्र पूर्णपणे शिवसेनेची सत्ता आल्याने विकासाची गंगा वाहणार आहे. माणगांव हे आदर्श नगर करण्यासाठी शिवसेना नेहमीच कटिबद्ध राहील. सर्व नगरसेवकांनी असे काम करा की, जनतेनीच तुम्हाला पुन्हा निवडून दिले पाहिजे. राज्यात शिवसेनेची सत्ता असताना काहीही कमी पडू दिले जाणार नाही. यासाठी मी वैयक्तिक प्रयन्त करणार आहे असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून ज्ञानदेव पोवार आणि प्रशांत साबळे तर राष्ट्रवादीकडून आनंद यादव व रिया उभारे यांचे अर्ज दाखल झालेले आहेत. असे एकूण माणगांव नगर पंचायत नगराध्यक्ष पदासाठी चार अर्ज दाखल झाले आहेत. दि.४ फेब्रुवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. तर दि. ९ फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे
यावेळी शिवसेनेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, शिवसेना नेते ऍड. महेंद्र मानकर, डॉ. संतोष कामेरकर, काशिराम पोवार, अंजली पोवार, नितीन बामुगडे, पत्रकार अरुण पोवार, रणधीर कनोजे, विरेश येरूणकर, सुनिल धुमाळ,नरेंद्र गायकवाड, उर्मिला साबळे, सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. खांदाड गावातील ज्ञानदेव पोवार यांचे समर्थक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
खासदार तटकरे ना देखील सर्व निर्णय पवारांना विचारूनच घ्यावे लागतात- ज्ञानदेव पवार
शिवसेनेकडून ज्ञानदेव पवार यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना.व पुन्हा शिवसेनेत प्रवेश करताना.नागरपंचायत निवडणूकीनंतर वृत्तपत्रामध्ये " खासदार तटकरे काय करिष्मा करणार? " अश्या पत्रकारांनी दिलेल्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.व पुढे म्हणाले की,खासदार तटकरे ना देखील सर्व निर्णय पवारांना विचारूनच घ्यावे लागतात. कुठले पवार ते त्यांचे ते समजतील अशी टीकेची तोफ देखील ज्ञानदेव पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व खासदार सुनिल तटकरे यांच्यावर डागली आहे.
राष्ट्रवादी शेकाप आघाडी तर्फे उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी नगराध्यक्ष आनंद यादव म्हणाले मी पुन्हा येईन ..!
शिवसेनेच्या माणगाव विकास आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल होताच अवघ्या काही मिनिटातच राष्ट्रवादी शेकाप आघाडी कडून माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आनंद यादव यांनी व रिया उभारे यांनी अर्ज दाखल केला त्यावेळी माजी नगराध्यक्ष आनंद यादव पत्रकारांशी बोलताना म्हणाले की "मी पुन्हा येईन!" मात्र सत्ताधारी खुर्चीवर वर बसण्यासाठी पुन्हा येईन की,विरोधी बाकावर बसण्यासाठी पुन्हा येईन याचा खुलासा मात्र आनंद यादव यांनी केला नाही.
यावेळी राष्ट्रवादी आघाडीतर्फे अर्ज दाखल करताना नगरसेवक आनंद यादव यांच्यासमवेत नगरसेविका रिया उभारे, सुविधा खैरे, सुशीला वाढवळ, हर्षदा सोंडकर, लक्षमी जाधव, रश्मी मुंढे, शेकाप नगरसेविका ममता थोरे, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे,दिलीप जाधव,माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे, माजी नगरसेवक जयंत बोडेरे,माजी स्वी नगरसेवक हेमंत शेठ,शहराध्यक्ष महमूद धूनवारे, चेतन गावणकर, विक्रांत गायकवाड,शेकाप पदाधिकारी युवानेते निलेश थोरे,माजी सरपंच अनंता थळकर, नामदेव शिंदे, बाळकृष्ण अंबुरले, मंदार मढवी आदी उपस्थित होते.