निलेश महाडीक यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार जाहीर
कोलाड : प्रतिनिधी
येथील पुई गावचे समाजसेवक, युवा कार्यकर्ता निलेश महाडीक यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री रमेश आव्हाड, सौ हेमाली जोशी, श्री प्रकाश सांवत, सौ मनिषा कदम आदि मान्यवरांचा हस्ते दि, १५ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबई येथील यशवंत नाट्य मंदिर, दादर मुंबई येथे हा कार्यक्रम पार पडला.
या पुरस्कारामुळे पुर्ण रायगड जिल्ह्यातील युवकांसाठी आदर्श ठरलेला आहे, मुंबई येथील या समारंभात राज्यातील अनेक मान्यवरही उपस्थित होते.
निलेश भाई महाडीक यांच्या या सन्मानाने माजी आमदार अनिलभाऊ तटकरे, माजी आमदार अवधूतदादा तटकरे, युवा नेते संदीप शेठ तटकरे, ॲड रेवती ताई तटकरे, दादा समर्थक प्रसादजी खुळे, संजय कणघरे रोहीत पवार, गौरव नाईक, संदिप म्हात्रे, ईकिदंर शेवाळे आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.