कोलाडमध्ये बेकायदा गावठी दारूची विक्री!
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी
कोलाडच्या बेकायदा गावठी दारूधंद्याला आशीर्वाद कुणाचा?
कोलाड : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात बेकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री जोरदार सुरू असून तरूणांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकजण या गावठी दारूच्या आहारी गेल्याचे दिसत आहे. या बेकायदा दारूधंद्याला आशीर्वाद कुणाचा? याबाबत कोलाड परिसरात एकच चर्चा आहे.
कोलाड पररिसरातील सरकारी दवाखान्याच्या पुढे टेकडीच्या दिशेला बेकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री जोरदार सुरू असून त्यावर कारवाई का होत नाही? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे. परिणामी या बेकायदा दारू धंद्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष पथक नेमण्याची गरज आहे. कारण त्याशिवाय येथील बेकायदा गावठी दारूधंदा बंद होणार नाही असेच दिसत आहे.