रोहा-नागोठणे भिसे खिंडीतील डेंजर झोन असलेल्या वळणामुळे संरक्षक भितीचे काम युध्दपातळीवर सुरु
प्रवासी वर्गात समाधानाचे वातावरण
रोहा : समीर बामुगडे
रोहा-नागोठणे भिसे खिंडीतील नागमोडी वळणावरुन जाताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गावर असलेल्या वळणावर नेहमीच अपघात घडत असतात. या डेंजर झोनमधील अपघाताची मालिका थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने लक्ष दिल्यामुळे प्रवासी वर्गात समाधानाचे वातावरण दिसुन येत आहे.
या रोहा नागोठणे रस्त्याच्या संरक्षक भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरु करुन नागोठणे भिसे खिंडीतील एकूण दोनशे मीटर लांबीच्या रस्ताचे काम नुकतेच सुरु झाले असुन शासनाच्या अपघात प्रतिबंधक जोजनेअंतर्गत सदर काम होणार आहे. या कामासाठी सुमारे एकेचाळीस लाख रुपये खर्च होणार असून सतरा ते अठरा मीटर संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दरीच्या बाजुला साईडपट्टी व डोंगर बाजूला पावसाळ्यात डोगरातुन येणाऱ्या पाण्याला मार्ग मोकळा करुन देण्यासाठी खोलगट गटार लाईन काढण्यात आली असुन या खिंडीत अनेक नागमोडी वळणे असुन ती अतिशय धोकादायक आहेत. या धोकादायक वळणावर काही वर्षापूर्वी झालेल्या अपघातात एक ट्रक खोल दरीत कोसळुन चालकाचा जागीच मृत्यृ झाला होता. या खिंडीत संरक्षक भिंतीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याने प्रवासी नागरिकांमधुन व वाहनचालकांकडुन समाधान, आनंद व्यक्त होत आहे,
अपघाती वळणावर संरक्षण भिंतीचे बांधकाम होणे गरजेचे होते. या कामाचा दर्जा उत्तम पद्धतीचा असणार याकडे आमचे बारकाईने लक्ष असणार व सदर काम निजोजित वेळेत पुर्ण होणार अशी प्रतिक्रीया रोहा सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता एम. एम. घाडगे यांनी दिली.