जामगाव येथे आर.सी.एम. उत्पादित दुकानाचे उद्घाटन
कोलाड : निलेश महाडिक
रोहा तालुक्यातील जामगाव येथील रमेश जनरल स्टोअर्स मध्ये आर. सी. एम. उत्पादित विविध वस्तू ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. याचे उद्घाटन श्री. बाळकृष्ण तवटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी श्री. टेकाडे, श्री. निलेश तवटे, श्री. बळीराम कोदे, श्री. नामदेव कोदे, श्री. विवेक लकेश्री, श्री. रमेश सालस्कर आदिंच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
चहा पावडर टुथपेस्ट, मसाला, साबण, हँडवॉश, तेल शरीरासाठी लागणारी पोषक औषध, तसेच सर्व प्रकारची गृह उपयोगी वस्तू उपलब्ध आहेत. रमेश जनरल स्टोअर्स चे रमेश सालस्कर यांनी सांगितले. येथे मिळणाऱ्या आर. सी. एम. उत्पादित वस्तू आरोग्यासाठी उपयुक्त असून स्वस्तही आहेत. येथील वस्तूंचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले.