वरसे ग्रामपंचात हद्दीत अनधिकृत बाधकामांचा सपाटा, बिल्डरकडून फसवणुक, पती-पत्नीविरूद्ध गुन्हा दाखल!

रोहा : समीर बामुगडे

खरेदीखत केल्यानंतर बिल्डरने निजोजित वेळेत ब्लॉकचे बांधकाम पूर्ण न करता तसेच ताबा न देता उलटपक्षी इमारतीमध्ये वाढीव बांधकामाबाबत एफ.एस.आय. न घेता बेकायदेशीरपणे पार्कींगमध्ये गाळ्याचे बांधकाम करुन खरेदीखताचा करार भंग करुन फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर व त्याच्या पत्नी विरोधात रोहा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश दामोदर मुंढे व मनीषा मंगेश मुंढे (राहणार भुनेश्ववर, ता. रोहा) असे आरोपी बिल्डर व त्याच्या पन्नीचे नाव आहे संबंधित बिल्डर मंगेश मुढे यांनी येथे एकविरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावाने फर्म सुरु करुन जागा विकत घेतली. या जागेत श्री स्वामी समर्थ या नावाने २० सदनिका असलेल्या ४ मजली इमारतीमध्ये तक्रारदार किरण गोपाळ शिर्के (रा. लांढर, ता. रोहा) यांनी एक सदनिका विकत घेण्यासाठी व या व्यवहारापोटी ७ जून २०१७ पासून २८ सष्टेंबर २०२० पर्यंत १९,५५,५९०/- रुपये रक्कम दिली व ती रक्कम बिल्डरने स्वीकारली. सदर सदनिकेचे खरेदीबाबत ५ डिसेबर २०१८ रोजी रोहा येथील दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात नोंदणीकृत दस्त तयार करून घेतला सदर करारानुसार बिल्डर मंगेश मुंढे याने सदर निवासी सदनिकेचा ताबा तक्रारदार किरण शिर्के यांना २४ महिन्यांच्या आत देण्याचे बंधनकारक असताना देखील सदर सदनिकेचा अद्यापपर्यंत ताबा न देता इमारतीमध्ये वाढीव बांधकामाबाबत एफएसआय न घेता बेकायदेशीरपणे पार्कींगमध्ये गाळ्याचे बांधकाम करून फिर्यादी किरण शिर्के यांच्या खरेदीच्या कराराचा भंग करुन बिल्डरकडून इतर साक्षीदार यांचा विश्वासघात करून फसवणूक केली. याबाबत फिर्यादी शिर्के यांनी जाब विचारले असता बिल्डरने महिलांसाठी नव्याने शक्ती कायदा अंमलात आले या कायद्याचा धाक दाखवुन तक्रारदारा विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची संगनमताने धमकी दिली.

याबाबत बिल्डर व त्याच्या पत्नीच्या विरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गदमले हे पुढील तपास करीत आहेत.

वरसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांचा सपाटा सुरू असून या बांधकामाचा सर्वे नंबर १९/१अ,ब,२,व,३, कुळअखत्यारी मंगेश दामोदर मुंढे, रा. भुवनेश्ववर यांनी या बांधकामाची नगररचना विभाग आलिबाग - रायगड यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच नगररचना विभागाच्या दुर्लक्षामुळे वरसे ग्रामपंचयतीमध्ये अनधिकृत बांधकामांचा सपाटा वाढत चालेला आहे.

तसेच रेराच्या कायद्याला फाट्यावर मारून या मंडळींनी आपले प्रताप सुरु ठेवले असून यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.

Popular posts from this blog